विद्राव्य खते

विद्राव्य खते

विद्राव्य खतांच्या योग्य ग्रेड्‌स पिकाच्या योग्य अवस्थेत वापराव्यात.

ही खते आम्लधर्मीय असल्याने ठिबकसंच चोकअप होऊन बंद पडत नाही.

बाजारात विविध विद्राव्य खते उपलब्ध असून यात

19:19:19,
20:20:00,
12:61:00, 00:52:34,
13:40:13,
00:00:50 +18,
कॅल्शियम नायट्रेट.(Calcium Nitrate)

अशा विविध ग्रेड्सचा समावेश आहे.

1) *19:19:19 / 20:20:00* :--
 

यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये समप्रमाणात आहेत.

या ग्रेडला स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात.

यातील नत्र हा अमाईड, अमोनिअम/अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो.

या खताचा प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी या ग्रेडचा उपयोग होतो.

2) *12:61:0* :--
   **********

यामध्ये अमोनिकल नत्र कमी असून पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते.

नवीन मुळांच्या तसेच ( जोमदार शाकीय वाढीसाठी)फळ-फांद्यांच्या वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरूत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.

याला मोनो अमोनिअम फॉस्फेट म्हणतात.

3) *0:52:34* :--
   **********

यात स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत.

फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.

पिकामध्ये बोंडे, शेंगा, फळांची योग्य पक्वता व सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत विशेषत्वाने वापरले जाते.

या खतास मोनो पोटॅशिअम फॉस्फेट म्हणतात.

4) *13:0:45* :--
   **********

या खतास पोटॅशिअम नायट्रेट म्हणतात.

यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते.

फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्वता अवस्थेत या खताची आवश्‍यकता असते.

अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.

या खतामुळे पीक अवर्षणप्रवण स्थितीत तग धरते.

5) *0:0:50 + 18* :--
   **************

या खतामध्ये पालाश बरोबर उपलब्ध स्वरूपातील गंधक असतो.

पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.

हे खत फवारले असता भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते.

या खतामुळे पीक अवर्षणप्रवण स्थितीत तग धरू शकते.

या खतास पोटॅशिअम सल्फेट म्हणतात.

6) *13:40:13* :--
   ***********

पात्या, फुले लागण्याच्यावेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबून कपाशीची बोंडे वा अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.

7) *कॅल्शियम नायट्रेट* :--
   (Calcium Nitrate)
   ******************

मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरवातीच्या काळात व बोंडे किंवा शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

8) *24:24:00* :--
   ***********

यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.

शाखिय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.

ही विद्राव्य खते ठिबक संचातून व्हेंच्युरी, बायपास दाब टाकी (प्रेशर टॅंक) किंवा थेट संचामधून देता येतात.

सोबत मर (wilt) रोगासाठी बुरशीनाशकांचा वापरही अत्यंत जरुरी.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट