डाळिंब पिक नियोजन

Jalindar Ovhal>‎शेतकरी मित्रPom info:डाळिब झाडाची लागवड ही प्रामुख्याने जमिन, हवामान, मातीचा प्रकार यासारख्या उत्पादनावर परिणाम करणारया घटकांवर अवलंबून असतेजमिनीची निवड:-हवामान आणि मातीचा प्रकार लागवडीकरिता पाण्याचा उत्तम निचरा होणारी (३-५%) उताराची जमीन निवडावी.दर्जेदार फळांच्या उत्पादनाकरिता १८-५५ सेमी वार्षिक पर्जन्यमान, उष्ण आणि कोरडा उन्हाळा आणि मध्यम हिवाळा असे हवामान उत्तम मानले जाते.हलकी परंतु सामू ८. ५ पेक्षा कमी असणारी जमीन योग्य असते परंतु योग्य व्यवस्थापनाद्वारे वेगवेगळ्या मातीच्या प्रकारामध्ये चांगले उत्पादन घेतले जाऊ शकते.बागेचा आराखडा:-बागेचा आराखडा तयार करताना रुंद व प्रशस्त मुख्य रस्ते, उप रस्ते, कामगारांच्या आणि यंत्राच्या दळण वळणासाठी महत्वाचे असल्याने त्यांची आखणी व्यवस्थित करावी.बागेस विजेचा आणि पाण्याचा व्यवस्थित आणि पुरेसा पुरवठा करण्याची सोय असावी. बागेमध्ये कार्यालय, भांडारगृह, साठवण कक्ष, पंपगृह, शेततळे या करिता जागा असावी. बागेभोवती तारेचे तसेच वायुरोधक कुंपण असावे. डाळींबाच्या लागवडीपूर्वी २ ते ३ वर्षे आधी करवंद, जांभूळ, बोगनवेलिया, शिसम, सिल्वरओक यांसारख्या वनस्पतीची बांधावर चोहो बाजूनी वायुरोधक कुंपण म्हणून लागवड करावी.खडडे खोदणे आणि भरणे:-जमिनीच्या पोतानुसार १ मी.X१ मी.x१ मी. किंवा ०. ७५ मि. x ०. ७५ मि. आकाराचे खड्डे खोदावेत. लागवडीपूर्वी किमान एक महिना अगोदर खड्डे खोदावेत आणि तसेच उघडे राहू द्यावेत जेणे करून सूर्यप्रकाशामुळे खड्डे निर्जंतुक होतील.खड्ड्याच्या चोहोबाजूंनी कार्बेन्डेझिम चे ०.१% तीव्रतेचे ४-५ लि. द्रावण व्यवस्थित ओतून खड्डे निर्जंतुक करावेत. खड्डे भरण्यापूर्वी कार्बोरील पावडर किंवा क्लोरोपाय्रीफोस५० ग्राम /खड्डा या प्रमाणात तळामध्ये तसेच चोहोबाजूवर टाकावे.खड्डे खालील घटकांनी भरावेत.शेणखत (चांगले कुजलेले )-१५ कि. ग्रामगांडूळखत-२.० कि . ग्रामनिंबोळीपेंड-१.५० कि. ग्रामट्रायकोडर्मा-२५.० ग्रामपी. एस. बी.-२५.० कि. ग्रामअझाटोबक्टोर-५.०ग्रामसुडोमोनास फ़्लुरोसन्स-१५.०ग्रामअझोस्पिरुलम-१५.० ग्रामचांगली वाढ झालेली, छाट कलम किंवा गुटी कालामापासून तयार केलेली ६ ते १२ महिने वयाची पोलिथिन मध्ये लावलेली रोपे लागवडी करिता निवडावीत. रोपांच्या लागवडी नंतर लगेच हलके पाणी द्यावे व त्यानंतर ठिबक सिंचन किंवा आळे पद्धतीने नियमित पाणी दयावे.लागवडीस योग्य कालावधीपाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवड (फेब्रुवारी -मार्च) किंवा (जुलै -ऑगस्ट) महिन्यामध्ये करावी.अंतर:-सामान्यपणे भगवा जातीच्या डाळींबा करिता दोन झाडामधील अंतर ४. ५ मी. ✕ ३.० मी. (७४० झाडे/हे.) आणि ५ मी. ✕५ मी. (४०० झाडे/हे.) हे अंतर जास्त वाढ असणारया गणेश जातीसाठी वापरावे. यांत्रिकीकरण आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून ४. ५ मी. ✕ २. ० मी. (१११० झाडे/हे.) या अंतरावर झाडे लावणे फायदेशीर ठरते. परंतु तेल्या ग्रस्त भागामध्ये अशा अंतरावर लागवड करू नये. अशा अंतरावर लावलेली झाडे ८ वर्षानंतर एका आड एक काढून टाकावीत किंवा वाढ मर्यादित ठेऊन उत्पादन घ्यावे.आधार:-सुरवातीच्या अवस्थेमध्ये झाडांना सरळ वाढण्यासाठी किंवा फांद्यांना आधार देण्यासाठी ५० ते ७५ से . मी. लांबीच्या बांबूच्या काठीचा आधार द्यावा आणि त्यास मुख्य खोडाच्या एक -दोन ठिकाणी सैल बांधावे.जातीडाळिंबाच्या व्यवसायिक उत्पादना साठी भगवा, गणेश, मृदुला, रुबी, आरक्ता, आणि ज्योती या जाती उपयुक्त आहेत.लागवडी नंतर घ्यावयाची काळजी:-नवीन लागवड केलेल्या झाडांना स्थिर होण्यास २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागत असल्याने या कालावधीमध्ये झाडांना नियमित पाणी द्यावे त्याच बरोबर मशागतीची इतर कामे वेळेत करावीत .डाळिंबाचे उत्पादन हे प्रामुख्याने सदृढ व निरोगी रोपांवर अवलंबून असते म्हणून लागवडीकरिता चांगल्या प्रतीच्या निरोगी आणि शास्त्रोक्त पद्धतीने बनविलेल्या रोपांचा वापर करणे आवश्यक असते. व्यावसायीकरित्या डाळींबामध्ये रोपांची निर्मिती हि छाट कलम, गुटी कलम आणि उती संवर्धन या पद्धतीद्वारे केली जाते. प्रमुख डाळिंब उत्पादक प्रदेशमध्ये (मध्य आणिदक्षिण भारत ) रोपांची निर्मिती हि गुटी कलमाद्वारे करण्यात येते.डाळींबाच्या दर्जेदार आणि निरोगी रोपांच्या निर्मितीकरिता प्रामुख्याने खालील पद्धतीचा वापर केला जातो.गुटी कलम :-डाळिंब उत्पादक प्रमुख राज्यामध्ये नवीन बागेच्या लागवडीकरिता गुटी कलमाद्वारे तयार केलेल्या रोपांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.गुटी कलम करण्याकरिता सरळ वाढलेल्या, निरोगी, आणि ८ ते १५ मि. मि. जाडीच्या काडीची निवड करावी व आतीलभागास इजा न होऊ देता अलगद गोलाकार कापून काढावी. काप दिलेल्या भागावर २००० ते ३००० पी. पी. एम. तीव्रतेच्या इंडोल ब्युट्रिक असिड (आय. बि. ए.)चा लेप द्यावा.साल काढलेल्या भागावर मॉस ओले करून चोहोबाजूंनी व्यवस्थित गुंडाळून त्यावर पोलिथिन मध्ये लावावी आणि रोप वाटिकेमध्ये जतन करवित. गुटी कलम प्रामुख्याने जास्त आर्द्रता असणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजेच जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये बांधावीत.गुटी कलमछाट कलम (हार्डवुड कटिंग)संपूर्ण जगामध्ये डाळींबीची रोपे तयार करण्यासाठी छाट कलम पद्धत वापरली जाते.या पद्धतीने वर्षभर रोपांची निर्मिती करणे सहज शक्य होते. या पद्धतीपासून तयार केलेली रोपे रोगमुक्त करण्याकरिता स्ट्रेप्टोसायक्लीन(स्ट्रेप्टोमायसिन असिड सल्फेट ९० % + टेट्रासायक्लीन १० %) ५०० पी. पी. एम. (५ ग्रॅम /लिटर) आणि कार्बेन्दाझिम १ ग्रॅम/लिटर याची प्रक्रिया लागवडीपूर्वी करावी.छाट कलमाद्वारे रोपांच्या निर्मितीकरिता ६ ते १८ महिने वयाच्या फांदीची निवड करावी. अशा फांदीचे २०-२५ से. मी. लांब आणि ६ ते १२ मि. मि. जाडीचे तुकडे धारदार कात्री किंवा सिकेटरच्या साह्याने करावेत.बागेच्या विश्रांतीच्या काळानंतर केलेल्या छाटणी मधील काड्या मध्ये रोप उगवणीचे यश जास्त प्रमाणात असते.अशा काड्यांचा बुडाकडील भाग इंडोल ब्युट्रिक असिड (आय. बि. ए.) या संजीवकाचा २५०० ते ५००० पी.पी.एम. (२.५ ते ५ ग्रॅम/लिटर) तीव्रतेच्या द्रावणामध्ये ३० सेकंद ते ५ मिनिटापर्यंत ठेवाव्यात.अशा प्रक्रिया केलेल्या काड्या,गाळाची माती, कोकोपीट आणि वाळूच्या १:१:१ किंवा २:१:१ मिश्रणामध्ये लावावीत.🍎🍎🍎🍎🍎🍎🍎3.मुख्य अन्नद्रव्य व्यवस्थापन:-खते मार्च ते ऑक्टोबर महिन्यात मुळाद्वारे मोठ्या प्रमाणात शोषली जातात म्हणून ह्या महिन्यामध्ये खते दिली पाहिजेत.कुजलेली सेंद्रिय खाते द्रव स्वरुपात टाकल्यावर झाडाकडे अन्नद्रव्याचे शोषण वाढते.शिफारशीत नत्राची अर्धी, स्फुरद व पालाशची मात्रा हि फळ तोडणी नंतर लगेच दिल्याने अन्नद्रव्यांचा संचय वाढून त्याचा पुढील हंगामात उपयोग होतो. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा फुलधारानेनंतर एका महिन्याच्या अंतराने २ सारख्या प्रमाणात द्याव्यात.पालाशफळांचा, आकार, उत्पादन,आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी बजावतो. ट्रीपल सुपर फोस्पेट किंवा डाय अमोनिअम फोस्पेट हे स्फुरद चा स्त्रोत म्हणून चुन्याच्या जमिनीमध्ये वापरावे परंतु चुन्याचे जास्त प्रमाण असणाऱ्या जमिनीत ठिबक सिंचन पद्धती सोबत स्फुरद हे सिंगल सुपर फोस्पेटच्या माध्यमातून द्यावे तसेच विरघळणारे स्फुरद द्वारे द्यावे.फवारानीतून पोटाशियम नायट्रेट (१.४८-२.२५ किलो/एकर) याप्रमाणे दिल्यास फळांचा आकार, उत्पादन, आणि फळ फुटीचे प्रमाण कमी होते. मान्सूनला सुरुवात होण्यापूर्वी सेंद्रिय व खते हि घेराच्या आकाराचे आळे करून दयावीत व इतर वेळी ड्रीपरच्या जवळ / खाली टाकावीत.🍎सुक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन:-🍎⭕जस्त (झिंक)१. कमतरतेस कारणीभूत घटक:-मातीचा जास्त सामू (pH)फॉसफेटचे जमीनतील अधिक प्रमाणजमिनीमध्ये असणारे सेन्द्रीये पदार्थाचे अधिक प्रमाण२. कमतरतेची लक्षणे:-पानांची व शेंड्याची वाढ कमी हॊतेफुलोरयाचे व फलधारानेचे धारणेचे प्रमाण कमी होतेफळे लहान आकारचे राहतात.🍎⭕जस्त कमतरतेची लक्षणे३. व्यवस्थापन व उपाय:-कमतरतेच्या लक्षणाची योग्य प्रकारे खात्री करावे. अशा प्रकारची लक्षणे बहार अवस्थेमधील झाडावर आढळल्यास चिलेटेड झिंक (EDTA-Zn) २. ५ ते ७. ५ ग्रॅम प्रती झाड या प्रमाणे प्रत्येक झाडाला द्यावे व त्या नंतर फवारणी मधून द्यावे.फवारणी करते वेळी फक्त झिंक सलफेट ०. ३० ते ०. ५० % प्रमाणे परंतु फळ तोडणी नंतरील फवारणीसाठी त्याचा सामु ताज्या चूनाच्या निवळीचा वापर करून (६. ५ ते ७ ) चा दरम्यान आणावा. फवारणीची उपयोगीतात तसेच पानाचे नुकसान टाळण्याकरिता त्या मध्ये सिलिकॉन युक्त स्टिकरचा किवा ०.२% तीव्रतेच्या युरिया द्रावणाचा वापर करावा.🍎⭕लॊह (आयर्न)१. कमतरतेस कारणीभूत घटक:-मातीची जास्त सामु असणेजमिनी मध्ये फोस्फेतचे अधिक प्रमाणपाण्याचा व्यवस्थित निचरा न होणारे जमीन.२. कमतरतेची लक्षणे:-नवीन जोमाणे वाढन्याऱ्या फुटव्याची पाने पिवेळी पडतात.🍎⭕लॊह कमतरतेची लक्षणे३. व्यवस्थापन व उपाय:-कमतरतेची लक्षणांची योग्य प्रकारे खात्री करावीकमतरता आढळल्यास चिलेटेड फेरस (Fe-EDDHA)@ ३ ते ५ मि ग्रॅम/ली प्रमाणे ठिबकसिंचन संचातून पाण्याद्व्यारे (फरटीगेशन) झाडांना द्यावे सोबतच चिलेटेड फेरसचा (Fe-DTPA)@ ०.३ ते ०.५ % प्रमाणातील फवारण्या लागोपाठ घ्याव्यात.फवारणीचा द्रावणामध्ये विविध प्रकारचे स्टिकर तसेच कॅलशीयम कलोराइड (०.२ %) यांचा वापर केल्यास त्याची उपयुक्तता वाढते. जास्त सामु असलेल्या जमिनी मधे लॊह उपलब्धता वाढ होण्यासाठी सायट्रीक असिड २ ग्रॅम / ली प्रमाणात फवारावेत.🍎⭕बोरॉन१. कमतरतेस कारणीभूत घटक:-मोठ्या आकाराचे मातीचे कण असणारी जमीनलगेच पाण्याचा निचरा होणारी जमीनजमिनीतील पाण्याची कमतरता२. कमतरतेची लक्षणे:-झाडाची वाढ खुंटते आणि मुळयांचा विकास कमी होतो .नर फुलेपूर्ण वाढहोण्या आधिच गळून पडतात. पोलन टयूबचा व्यवस्थित विकास नझाल्याने फळ धारण खुपच कमी होते.फळे तडकतात किंवा त्यांचा आकार वेडावाकडा होतो .३. व्यवस्थापन व उपाय:-कमतरतेची योग्य प्रकारे खात्री करावी. फवारणी करिता सोल्यूबोर (२०% बोरॉन ) किंवा बोरिक आम्ल (१७% बोरॉन) ०. ०५ ते ०. १ % प्रमाणात फुलोऱ्यात येण्यापूर्वी एक आणि पाकळया गळल्या नंतर ७ ते १० व ३० दिवसांनी आणखी एक अशा दोन वेळा फवारणी करावी. फळे पक्व होण्याचा अवस्थेमध्ये बोरॉनची फवारणी घेऊ नये कारण त्या मुळे फळे लवकर पक्व होतात. दर वर्षी झाडांना बोरयाक्स (११% बोरॉन) किवा ग्रेन्युबोर (१५% बोरॉन) ०. ५६ ते १. १२ कि . ग्रॅम /हे . या प्रमाणात जमिनीतील कमतरते नुसार द्यावे.🍎⭕मंगल (मेंगनीज)१. कमतरतेस कारणीभूत घटक:-जमिनीचा सामु अधिक असल्यास ताबडतोब पाण्याचा निचरा होणारी जमीन असल्यास२. कमतरतेची लक्षणे:-मध्य शीर सोडून पानांचा इतर भाग फिक्कट हिरव्या रंगाचा होतो .🍎⭕मंगल कमतरतेची लक्षणे३. व्यवस्थापन व उपाय:-कमतरतेची लक्षणांची प्रकारे खात्री करावी.पानांवर लक्षणे दिसून आल्यास मेंगनीज सलफेट ०.४० ते ०.६० % या प्रमाणात फुलांचा पाकळया गळाल्या नंतर ७ ते १० दिवसांनी फवारणी करावी.मेंनकोझेबया बुरशी नाशका मधून सुद्धा मेंगनीजचा पुरेसा पुरवठा झाडांना होतो त्यामुळे रोगनियंत्रण करिता याचा वापर उपयुक्त ठरते .🍎⭕तांबे (कॉपर)१. कमतरतेस कारणीभूत घटक:-जमिनीचा सामु अधिक असल्यासजमिनी मध्ये फॉसफेटचे प्रमाण अधिक असल्यासजमिनीमध्ये सेंद्रिय पधार्ताचे प्रमाण अधिक असल्यास२. कमतरतेची लक्षणे:-पानांची वाढ अस्वाभाविक आणि वेडीवाकडी होते.शेंडयांची वाढ खुंटून शेंडा / मरतो.फुले कमी प्रमाणात येउन फळ धारणा कमी होते .फळांचे आकार छोटा आणि दार्जा राहतो.🍎⭕तांब्याच्या कमतरतेची लक्षणे३. व्यवस्थापन व उपाय:-लक्षणे नीट तपासून खात्री करावी.कमतरता आढळल्यास फक्त कॉपर सलफेट ०. २% या प्रमाणात किवा फळ काढणी नंतर किंवा फुलधारणेपुर्वीच्या फवारणीसाठी (सामू ७. ० करण्या करिता ताज्या चुन्याच्या निवळीचा) वापर करावा.सामू ७. ० वर नियंत्रित करण्या करिता ताज्या चुन्याच्या निवळीचा वापर नियमित करावा.ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा वापर शिफारशीनुसार करावा म्हणजे त्या मधूनतांब्याचा पुरेसा पुरवठा झाडांना होण्यास मदत होते.🍎🍎🍎🍎🍎🍎🍎५. डाळिंब फळांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन🍎१) तेलकट डाग रोग :-अ ) सुरुवातीस झाडाच्या कोणत्या भागावर काळपट करडया रंगाचे डाग दिसतास करावयाचे उपाय :-🍎उपाय :-पिक कालावधी मध्ये रोग नियंत्रणासाठी (०. ५%बोर्डोमिश्रणाची परंतु १%छाटणी केल्यानंतर ) व त्यानंतर स्त्रेप्तोसायक्लीन (५ग्राम /१०लि. )किंवा २-ब्रोमो ,२- नायट्रो प्रोपेन १,३-डायोल (ब्रोनोपॉल) (५ ग्राम . /१०लि.)+ कॉपर ऑक्सिक्लोरीड किंवा कॉपर हाड्रोक्साईडची (२०-२५ग्राम ./१०लि. )पाण्यात संयुक्तरीत्या मिसळून फवारणी करावी. जर इतर बुरशीजन्य रोग आढळल्यास कॉपर एवजी योग्य ते बुरशीनाशक फवारणीसाठी वापरावे .विश्रांती कालावधीमध्ये छाटणीनंतर बोर्दोदिश्रानाची (१%) प्रतिबंधक फवारणी घ्यावी . तसेच आलटून पालटून स्त्रेप्तोसाय्क्लीन (२. ५ग्राम./१०लि.) किंवाब्रोनोपॉल ५ग्राम. /१० लि. +कॉपर ऑक्सिलोरीड /कॉपरहाड्रोक्साईडची (२०-२५ग्राम /१० लि. )संयुक्तरीत्या फवारणी करावी . दोन फवारणीतील अंतर १५ ते २० दिवस ठेवावे.🍎बागेतील स्वच्छता :-(जीवाणूंची वाढ आणि प्रसार थांबविण्यासाठी )प्रादुर्भाव झालेली झाडांची पाने , फळे व फांद्या शेतातून काढून जाळ्याव्यात.ब्लिचिंग पावडरच्या साहयाने (कि.घ. ३३% क्लोरीन )प्रत्येक ३ महिन्यांनी २५कि. ग्रा . /१०० लि . /हेक्टर पाण्यात मिसळून झाडाखालील मातीत ओतावेछाटणी करावयाची अवजारे सोडियम हायपोक्लोईडच्या (२. ५%) च्या साह्याने निर्जंतुक करावीत.बागेतील तणे उपटून नष्ट करावीत व बाग तणमुक्त ठेवावीत.ब) फळावर काळपट करड्या रंगाचे ठिपके दिसतात, फळावर चिरा पडतात व ते फुटते. प्रादुर्भाव वाढल्यास रोगाचे तेलकट डाग फांद्यावर सुद्धा आढळतात .🍎उपाय :-रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन (५ ग्रॅम. /१०लि.) किंवा ब्रोनोपॉल (५ग्रॅम /१० लि. )+कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रोक्सिड (२० ते २५ ग्रॅम. /१० लि.) ची फवारणी आलटून पालटून बोर्डो /बोर्डोक्स मिश्रणाच्या (०. ५ ते १%) च्या फवारणी सोबत करावी.🍎बहार बदलणे :- मृग बहार घेणे टाळावे आणि त्याएवजी कमीतकमी ४-५ वर्ष हस्त बहार घ्यावा.बागेतील स्वछता (जीवाणूंची वाढ आणि प्रसार थांबविण्यासाठी ) आधी दिल्या प्रमाणे करावी.🍎बागेतील झाडाची छाटणी :-तेल्या रोगाची लागण झाडांच्या इतर फांद्यांवर झाली असल्यास त्यांची छाटणी करावी आणि त्या जाळ्याव्यात.फांद्याची छाटणी प्रादुर्भाव ग्रस्त भागापासून २-३ इंच खालून करावी.छाटणी केल्यानंतर त्या भागावर बोर्डेक्स पेस्ट (१०%) लावावी. पावसाळ्यात तेलयुक्त पेस्ट (५०० ग्रॅम . कॉपर ऑक्सिक्लोराईड +१लि. जवसाचे तेल )वापरावी किंवा चौबातीया पेस्ट (१किलो लाल गेरू +१ किलो कार्बोनेट +१. २५ लि . जवसाचे तेल ) वापरू शकता.झाड मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावग्रस्त झाल्यास तेउपटून काढून टाकावे व त्या जागी नवीन रोप लावावे किंवा त्या झाडाचे मुख्य खोड जमिनीपासुन २-३ इंच वरून तोडावे आणि नवीन निघणाऱ्या फुटव्यामधून खोड तयार करावे.🍎बागेत घ्यावयाची दक्षता:-गरज असेल तरच फवारणी घ्यावी व रसायने योग्य मात्रेतच वापरावीत अन्यथा जास्त फवारण्यामुळे रोग वाढीस चालणा मिळते.फवारणीच्या अगोदर सर्व प्रादुर्भाव ग्रस्त फळे काढून जाळून टाकावीत.कीटकनाशके,बुरशीनाशके, किंवा अन्नद्रव्य यांच्या फवारण्या जीवाणू नाशकासोबत एकत्रित करून फावाराव्यात.पीककालावधीमध्ये पाऊस पडल्यानंतर लगेचच अतिरिक्त जीवाणूनाशकाची फवारणी करावी.नेहमी (पाऊस असताना किंवा नसताना)चांगल्याप्रतीचे स्प्रेडर आणि स्टीकर फवारणीमध्ये वापरावेत व बोरडेक्स मिश्रणामध्ये ते वापरू नयेत.बोरडेक्स मिश्रणाचे द्रावण तयार केल्यानंतर त्याचा वापर ताबडतोब करावा (एक दिवसामध्ये).झाडांना संतुलित अन्नद्रव्ये पुरवावी, तसेच झाडांना ३ ते ४ महिन्याची विश्रांती दयावी आणि झाडांची योग्य वाढ व रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी वर्षातून फक्त एकच बहार घ्यावा.फळे काढल्यानंतर बागेच्या विश्रांती कालावधीमध्ये रोगप्रतिबंधक फवारण्या न चुकता नियमित घ्याव्यात.🍎२) मर रोग :-या रोगामुळे लागण झालेल्या झाडाची एखादी फांदी किंवा संपूर्ण झाडावरील फांद्या शेंड्याकडून पिवळ्या पडतात.🍎सविस्तर उपाय :-हा रोग बुरशी व खोड भुंगेरे यांच्यामुळे झाल्याची लक्षणे दिसताच क्लोरपायरीफॉस २०ई. सी. (२. ५ ते ४ मि. ली. /लि.)+कार्बेन्डाझीम ५० डब्लू पी. (२ग्रॅम. /लि. ) किंवा प्रोपिकोण्याझोल २५ ई. सी. (२मि. ली. /लि) या औषधाचे ५ ते ८लिटर द्रावण झाडाच्या बुंध्याजवळच्या भागात चोहोबाजूंनी माती ओली होईल इतपत ओतावे. प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या सभोवतालच्या भागात तसेच निरोगी झाडाभोवती १५ ते २० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळेस अशा प्रकारचे ड्रेचिंग करावे.खोड पोखरणारी आळी व खोड भुंगेर्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास माती /काव /गेरू (४ किलो )+लिंडेन (२५ग्रॅम) + क्लोरोपायरीफॉय २० इ. सी. (२०मि ली )+कॉपरऑक्साईड (२५ग्रॅम ) यांच्या मिश्रणाची १० लिटर पाण्यामध्ये पेस्ट बनवून खोडला जमिनीपासून १ते २फुट वरपर्यंत लावावी.खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास छिद्रातील भुसा सुईने बाहेर काढावा आणि प्रत्येक छिद्रात २ ते ३ मिली डी. डी. व्ही. पी. चे द्रावण (५मिली /१०ली)सोडून छिद्र लगेचच चिखलाने बंद करावे.मार रोग जर सुत्रकृमिमुळे झाला असेल तर झाडाच्या अळ्यातील माती गोलाकार उकरून त्यात फोरेट १०जी (१० ते २०ग्रॅम. /झाड )किंवा कार्बोफ्युरोन ३जी (२० ते ४० ग्रॅम. /झाड )टाकावे व पुन्हा मातीने झाकून घ्यावे तसेच दोन झाडांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत किंवा प्रत्येक झाडांच्या बुंध्याभोवती आफ्रिकन झेंडूची लागवड करावी. यामुळे सुत्रकृमिंची संख्याकमी होण्यास मदत होते. जर झेंडूची झाडे ४-५महिने तशीच राहू दिली तर त्याचा सुत्रकृमी नियंत्रणासाठी चांगला उपयोग होतो. मर रोगाची लक्षणे दिसताच क्षणी लागण झालेले झाड आणि निरोगी झाड यामध्ये ३-४ फुट लांबीची चर खोदल्यास त्याचा इतत्र होणाराप्रसार रोखण्यास मदत होते. बागेमध्ये मर रोगग्रस्त झाडे आढळल्यास ती तोडून शेताच्या बाहेर खड्ड्यामध्ये जाळावीत.छाटणी करावयाची अवजारे निर्जंतुक करावी. छाटणी पावसाळा ते उन्हाळा या कालावधीमध्ये टाळावी व नेहमी हिवाळ्यामध्ये करावी. प्रादुर्भाव व निरोगी झाडांवर आंतरप्रवाही बुरशी नाशकांची फवारणी करावी.🍎३) फळावरील बुरशीजन्य ठिपके आणि फळकुज:-फळाच्या सालीवर वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे ठिपके आणि पाकळी किंवा देठांच्या टोकाकडून फळे कुजलेली आढळतात.🍎सविस्तर उपाय :-मृग बहारामध्ये या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते म्हणून हस्त अथवा आंबेबहर घेणे अधिक सोयीस्कर ठरते.बागेच्या चांगल्या व्यवस्थापनासाठीनियमितपणे कीड व्यवस्थापन व स्वच्छतेमुळे (जुनी फळे, कोमेजलेल्या /वाळलेल्या फांद्या काढून टाकणे )रोगाचे प्रमाण कमी करता येते.फळ तोडणीनंतर जर बागेकडे दुर्लक्ष केले तर बुरशीच्या बिजानुंचा संचय बागेमध्ये व प्रसार संभवतो. फळांची काढणी पश्चात हाताळणी करताना फळांना इजा होऊ नये याची काळजीघ्यावी कारण अशा जखमांमधून फळकुजसाठी कारणीभूत असणाऱ्या बुरशीची लागण होते. म्हणून बोर्डेक्स १% आणि कॉपर च्या फवारण्या विश्रांती कालावधीमध्ये पण नियमित कराव्यात.🍎खालील पैकी कोणत्या बुरशी नाशकाची फवारणी करावी :-क्लोरोथ्यालोनिल७५% डब्लू. पी. (ग्रॅ. लि),थायोफेनेट मिथिल ७०% डब्लू. पी. (१. ५ ग्रॅ. /लि ),कार्बेन्डाझीम (१. २ग्रॅ. /लि ), म्यान्कोझेब ७५% डब्लू. (पि. २ग्रॅम. /लि ),कॅप्टन ५०%डब्लू. पी. (२ ग्रॅ. /लि)बेनोमील (०.५-१ ग्रॅ. /लि),सल्फर ८०% डब्लू. पी. (२. ५ ग्रॅ./लि ), आणि बोर्डेक्स मिश्रण (१%).🍎फवारण्याची सुरुवात फुले येण्याच्या अगोदर किंवा फुले आल्यावर आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने हवामानाच्या अंदाजानुसार आणि बुरशी नाशकाच्या प्रकारानुसार कराव्यात.🍎४) फुलकिडे:-फुल किड्याच्या प्रादुर्भावामुळे झाडांची कोवळी पाने वेडेवाकडे व गुंडाळलेले आढळतात. तसेच फळांवर ओरखड ल्या सारखे व गंजल्यासारखे खडबडीत चट्टे पडतात .🍎सविस्तर उपाय :-प्रादुर्भाची लक्षणे दिसताचक्षणी थायोमिथोक्झाम २५ डब्लू. जी (०. ३ ग्रॅम/लि )किंवा असेटामिप्रीड ७५ एस. पी. (१ग्रॅम/लि) चि फवारणी पालवी ते फळ तोडणीपर्यंतच्या कालावधी मध्ये करावी .प्रादुर्भाव झालेली कोवळी पाने नेहमी नष्ट करावीत.फुलकिडे मिरची, कांदा, लसुन, व टोमाटो या पिकांवर देखील उपजीविका करत असल्यामुळे डाळींबामध्ये यासारखी आंतरपिके घेऊ नयेत.🍎५) फळे पोखरणारी अळीकळी,फुले व फळांवर छिद्रे दिसताक्षणी करावयाचे उपाय :-🍎सविस्तर उपाय :-फुल धारणा ते फळ काढणीपर्यंतच्याकालावधीमध्ये डेल्टामेथ्रीन २. ८ ई . सी. (१. ५ मि. ली. /लि )किंवा मिथोमिल ४० एस. पी. (१ ग्रा./लि. )किंवा अझाडीरक्तीन १५०० पी . पी . एम (३मि. ली. /लि .) ची फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी. प्रादुर्भावग्रस्तफळे, फुले व कळ्या जमा करून नष्ट कराव्यात हि कीड पेरू, चिकू, आवळा आणि चिंच या फळांवर देखील उपजीविका करत असल्याने डाळींबामध्ये या सारखी आंतरपिके घेऊ नयेत.जर डाळींबाची बाग १-२ हेक्टर असल्यास फळांना बटर पेपरणे झाकून घ्यावे त्यामुळे फळ पोखरणाऱ्या अळी पासून संरक्षण मिळते.🍎६) डाळींबामधील रस शोषणार पतंग आणि त्याचे व्यवस्थापनतीव्रता :-डाळींबामध्ये आढळणारे रस शोशाणारा पतंग हा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये सक्रिय होऊन मृग बहारमधील फळांचे मोठे नुकसान करतात.🍎अ) ओर्थेइस म्यार्तेना :-या जातीच्या पतंगाचे शरीर हे नारंगी रंगाचे असून नर आणि मादी पतंगामध्ये पाठीमागच्या पंखावर काळा ठिपका आढळतो.🍎ब ) अर्थेइस फुलोनिआ :-या पतंगाचे शरीर नारंगी रंगाच्या खवल्यांनी आच्छादलेले असते आणि नर व मादी या दोहोंमध्ये पाठीमागील पंखावर इंग्रजी उलट"c "अक्षराचे ठिपके असतात.🍎क ) आर्थेइस होनोईना :-या जातीच्या पतंगाचे शरीर नारंगी रंगाचे असून पुढील पंखावर पोपटी रंगाचे पट्टे असतात. नर आणि मादीमध्ये पाठीमागील पंखावरइंग्रजीतील "c " आकाराचे ठिपके असतात.🍎ड ) अचइआ जनाटा :-या पतंगाचे पुढील पंख हे तपकिरी -करड्या रंगाचे असतात. तर पाठीमागील करड्या रंगाच्या पंखावर टोकाकडील बाजूस चमकदार पांढऱ्या रंगाच्या खुणा आढळतात.🍎नुकसानाची पद्धत :-या पतंगाची सोंड हि फळाच्या सालीला छिद्र पडण्याइतपत मजबूत असते. रात्रीच्यावेळी नर आणि मादी दोन्ही पतंग फळांना छिद्रे पाडून नुकसान करतात. अशा छिद्रामधून विविध प्रकारच्या बुरशी व जीवाणूचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे अशा छिद्रामधून रस बाहेर पडताना दिसतो. अशा प्रकारे कालांतराने बुरशी व जीवाणूच्या प्रादुर्भावाने फळ सडन्यास सुरुवात होऊन अशी फळी नंतर गळून पडतात.🍎उपाय :-फळ शोषनारा पतंग हा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सक्रीय होत असल्याने ज्या भागांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळून आलेला असल्यास त्या भागांमध्ये मृग बहार घेणे टाळावे.या पतंगाचे पोषण करणाऱ्या इतर वनस्पती टिनोस्पोरा स्पेसीज,घाणेरी , एरंडी इ . वनस्पती बागेच्या परिसरातून नष्ट कराव्यात.प्रादुर्भावग्रस्त फळे तोडू नयेत कारण अशा फळाकडे पतंग परत आकर्षिला जात असल्याने चांगल्या फळांचे संरक्षण होण्यास मदत होते.बटर पेपर, वर्तमान पत्र तसेच पॉलिमर पिशव्या यांच्या आच्छादनानेफळे झाकून टाकावीत.रात्रीच्या वेळी प्रखर झोताच्या विजेच्या (टोर्च) साहय्याने पतंगाना पकडून जाळून टाकावे.विषारी आमिष बनवण्याकरिता ९५% मळी किंवा काकवी आणि ५% म्यालाथिओन ५० ई . सी . चा वापर करावा. अशी आमिषे रात्रीच्या वेळी सी एफ एल दिव्याखाली मातीच्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये ठेवावी. त्यामुळे प्रकाशाकडे पतंग आकर्षिले जाऊन विषारी अमिषामध्ये पडून मरतात.🍎🍎🍎🍎🍎🍎🍎६. डाळींब फळाचे काढणी पश्चात व्यवस्थापन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन:-🍎डाळिंब फळाचे तोडणीपूर्वी पक्व्तेची लक्षणे :-भगवा जातीचे फळ १५० तर गणेश जातीचे फळ १३५ दिवसांनी पक्व होतात.भगवा जातीची फळे पक्व झाल्यानंतर गडद लाल व गणेश जाती मध्ये पिवळसर रंग येतो व दोन्ही मध्ये सालीवर चकाकी दिसून येते.पक्वतेत कळीच्या पुढच्या टोकाचा भाग आतील भागास वळतो व अतिशय कोरडा /कडक झालेला असतो.फळांचा आकार कठीण बनतो आणि फळावरील साल खरवडली जाऊ शकते.फळाला बोटांनी टिचकी मारल्यावर खणखण आवाज येतो.पक्व्तेमध्येभगवा जातीच्या फळातील दाणे भडक लाल तर, गणेश जातीतील दाणे फिक्कट गुलाबी दिसतात.रसाचा टि एसएस १३-१६. ५ ब्रीक्स आम्लातांक ०.८ % टि एस एस व आम्लतेचे गुणोत्तर २५- ४० इतके असते.🍎फळांची तोडणी:-पूर्ण पक्व झालेल्या फळांची तोडणी सकाळी किंवा दुपार नंतर करावी .फळ तोडताना ओढून न तोडता जागेवरच कात्रीने तोडावीत/ काटावे.साठवण खोक्यामध्ये आधी कागदाचा लगदा वगैरे ठेऊन मग त्यात तोडलेली फळे ठेवावीत🍎फळांची प्रतवारी नुसार संवेष्टन :-खालीलप्रमाणे वजनानुसार फळांची प्रतवारी ठरवली जाते . फळांचे श्रेणीकरण शेतामध्ये गुणवत्ता तसेच डागांच्या आधारावर केले जाते. तोडणी नंतर फळांचे श्रेणीकरण खाली दिलेल्या गुणांच्या आधारे केले जाते .सुपर साईज:-आकर्षक मोठया आकाराची, गडद रंगांची डाग नसलेली >७५० ग्रॅ.किंग साईज:- आकर्षक मोठया आकाराची, डाग नसलेली वजन >५०० ग्रॅ.क्वीन साईज:- मोठया आकाराची,आकर्षक किरकोळ डाग नसलेली >४००ग्रॅ. आणि <५०० ग्रॅ.प्रिन्स:- आकर्षक डागविरहीत, वजन>३००आणि <४००ग्रॅ.१२-अ:- १-२ ठिपके असलेली, वजन >२००ग्रॅ. आणि <३००ग्रॅ.१२-ब:- वजन <२५० ग्रॅ.🍎संवेष्टन :-श्रेणीकृत केलेले फळ कपड्यांनी साफ करा किंवा त्यांना ईथिल ओलेट द्रावणामध्ये बुडवून काढा. त्यामुळे त्यांचावरील माती व धुळ स्वच्छ होऊन फळांना चकाकी येते.सर्वोकृष्टश्रेणीतील प्रत्येक फळांवर टिशु पेपर किंवा प्लास्टिक लायनर लावला पाहिजे.निर्यातीसाठी चार किलो क्षमता असलेल्या कार्डबोर्ड करोगेटेड फायबरबोर्ड (३७५X २७५X १०० मि. मि.) किंवा ५ किलो क्षमता असलेल्या (४८० X३००X१०० मि. मि.)बॉक्समध्ये संवेष्टन केले जाते.🍎साठवण:-८ आठवड्यापर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी तापमान ५ अंश से. आणि सापेक्ष आद्रता ९०-९५% पाहिजे.फळांचे साठवण ५ अंश से. पेक्षा कमी तापमानात केल्याने चिलिंग इन्जुरी होते.आद्रता नियंत्रण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आद्रता कमी झाल्यास फळे ही कोरडी बनतात आणि त्यांची साल कडक होते.🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎७. डाळींबापासून मुल्यवर्धित उत्पादने🍹🍎डाळींबाचा रस :डाळींबाचा रस हा पूर्णपणे फळे दाबून किंवा त्यांच्यादाण्यापासून रस काढला जातो. अशा रसाला फ्लाश पाश्चुराईझर यंत्रामध्ये ७९-८२ अंश से. तापमानाला तापवले जाते व नंतर थंड झाल्यावर २४ तासासाठी रेकिंग केले जाते व नंतर त्याला सूक्ष्म गाळणयंत्राद्वारे गाळुन घेतले जाते. असा रस हा उष्मा प्रक्रीयेने साठवता येतो किंवा (६०० पी.पी.एम) सोडियम बेन्झोएट चा वापर करून साठवता येतो. ८० अंश से. तापमानाला ज्यूस तापवल्यावर तो गरम बाटल्यामध्ये ओतला जातो. बाटल्याना बुचे लावल्यानंतर ३० मिनिटांनी ८० अंश से. तापमानासाठी निर्जंतुक केल्या जातात.🍹🍎आर.टी. एस शीत पेय :आर.टी. एस शीत पेय बनवण्यासाठी डाळींबाचा १५%रस +१५ ब्रिक्स टी. एस. एस. बनवण्यासाठी साखर व ०.३% आम्लताक ठेवण्यासाठी सायट्रिक असिड टाकावे.🍹🍎कार्बानिकृत आर.टी. एस पेय :-कार्बानिकृत आर. टी. एस तयार करण्यासाठी १७% डाळिंब रस +१२% साखर मिसळून ०.३% आम्ल्तांक ठेऊन, ८० पी. एस. आयला कार्बनडाय ऑक्साईडचा दाब देवून कार्बनीकृत केले जाते.🍹🍎डाळींबापासून जेली :-जेलीकारताना डाळींबाचा जूस व साखर १:१ प्रमाणात घेऊन उत्तम रंग, चव व साठवनूकीसाठी सायट्रिक असिडचा उपयोग केला जातो.🍹🍎अनारदाना :-अनारदाण्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये पचनासाठी व पोट विकारासाठी उपाय म्हणून केला जातो . अनारदानाचा वापर भारतामध्ये सांबरतयार करण्यासाठी व पारंपारिक औषध पद्धतीत आम्लता वाढवण्यासाठी आणि मासल्याचा पदार्थ म्हणून उपयोग केला जातो. उच्च प्रतीचा अनारदाना बनविण्यासाठी ५५ अंश से. तापमानाला ७ तासांसाठी शुष्कक यंत्रामध्ये (ड्रायर) आंबट जातीचे डाळींबाचे दाणे ठेवले जातात.🍹🍎किमान प्रसंस्कृत डाळींबाचे दाणे:-डाळींबापाचे दाणे काढून त्यांना मोडिफाईड अटमॉस्पेरीक प्याकेटमध्ये बंद केले जाते. त्यांना १५ दिवसापर्यंत शीतगृहात (५ अंश से.) ला साठवू शकतो.🍹🍎डाळींबा च्या बियांपासून तेल :-डाळींबा च्या तेलामध्ये असलेल्या क्वान्जुग्येटेडचरबी युक्त -एसिड्स मुळे ते औषधी म्हणून कार्य करते. त्यामध्ये इतर महत्वाचे घटक जसे कि ग्यामा टोकोफेरोल, डाळींबापासून दुर्मिळ असे ई जीवनसत्व तसेच बिटा सिस्टोस्टेरोल ,स्तीगमास्तेरोलआणि काम्पेस्त्रोल हि फायस्तेरोलचे प्रकार डाळींब बियांच्या तेलामध्ये आढळतात. त्यांचा उपयोग ह्र्दय स्वास्थ सुधारण्यासाठी आणि कॅन्सर तसेच अरथेरोस्केरोसिसला प्रतिबंध करण्याकरिता होतो. डाळींबाच्या दाण्याने तेल कोल्ड्प्रेस पद्धतीत काढला जातो या तेलाची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात भरपूर मागणी आहे.🍹🍎डाळिंबापासून वाईन :-डाळींबाच्या ज्यूस पासून चांगली गुणवत्ता असलेली स्पार्कलिंग वाईन बनवता येते. ज्यूस टि एस एस, साखरेचा वापर करून नियंत्रित क

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट