खरड छाटणी आधी करावयाची कामे
आपल्याकडे द्राक्ष बागेत दोन वेळा करण्यात येणारी छाटणी आणि सबकेन, सुपर सबकेन फुटींची केलीजाणारी विरळणी याद्वारे नाहीसे होणारे अन्नघटक, उत्पादनात खर्ची पडलेले अन्नघटक व त्यामुळे खर्ची झालेली वेलीची शक्ती विचारात घेता काढणीनंतर वेलीस विश्रांती देणे अत्यंत आवश्यक आहे.विश्रांती काळातदेखील बागेची निगा राखणे आवश्यक असते.डॉ. एस. डी. रामटेकेरवींद्र कोरसध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व विभागांतील द्राक्ष बागांची काढणी चालू आहे. काही बागांची काढणी संपून त्या खरड छाटणी घेण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. आपल्याकडील द्राक्षवेलीच्या वाढीचे चक्र लक्षात घेता दोनदा द्राक्ष छाटणी घेण्याची पद्धत आहे. अशातच या वर्षी पाण्याच्या कमतरतेमुळे बहुतेक बागांची फळ छाटणी नेहमीपेक्षा लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे अशा बागांची खरड छाटणीदेखील लवकर घेणे गरजेचे ठरते. ज्या बागेची द्राक्ष काढणी एवढ्यात झाली आहे, त्या बागेत लागलीच खरड छाटणी घेऊ नये. अशा बागेला विश्रांती देणे गरजेचे ठरते. द्राक्ष काढणीनंतर खरड छाटणीपर्यंतचा कालावधी द्राक्ष उत्पादन चक्रामध्ये महत्त्वाचा आहे. मागील वर्षाचे उत्पादन, वेलीच्या क्रयशक्तीमध्ये झालेला व्यय, तसेच द्राक्षवेलीचे सतत वाढ होत राहिल्यामुळे आपल्याकडे नैसर्गिक विश्रांती मिळू शकत नाही. दोन वेळा करण्यात येणारीछाटणी आणि सबकेन, सुपर सबकेन फुटींची केली जाणारी विरळणी याद्वारे नाहीसे होणारे अन्नघटक, उत्पादनात खर्ची पडलेले अन्नघटक व त्यामुळे खर्ची झालेली वेलीची शक्ती विचारात घेता काढणीनंतर वेलीस विश्रांती देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी विश्रांतीचा कालावधी 30 ते 40 दिवसांचा असावयास हवा. द्राक्ष काढणीनंतर वेलीस विश्रांती देणे म्हणजे वेलीस "ताण' देणे नव्हे. काही वेळा विश्रांती देणे म्हणजे बागेकडे दुर्लक्ष करणे, असा घेतला जातो. परंतुवेलीच्या विश्रांती काळातदेखील बागेची निगा राखणे आवश्यक असते. याच दरम्यान बागेत काही प्रमाणात अन्नद्रव्ये व पाणीपुरवठा केल्यास व्यय झालेली शक्ती भरून निघण्यास मदत होते.द्राक्ष काढणीनंतर वेलीचे पोषण व व्यवस्थापन -वेलीच्या क्रयशक्तीचा मोठ्या प्रमाणात व्यय झालेला असतो. विश्रांतीच्या कालावधीमध्ये वेलीचेपोषण व्यवस्थापन केल्यास वेलीची झीज भरून येत. तसेच वेलीमधील अन्नद्रव्ये वाढण्यास मदत होईल. खरड छाटणीनंतर बाग लवकर फुटून येण्यास मदत होईल. विश्रांतीच्या कालावधीत द्राक्ष काढणीनंतर एकूण मात्रेपैकी दहा टक्के खतांची मात्रा बागेस द्यावी. बोद फोडून घ्यावेत व शिफारशीनुसार रासायनिक खतांचा वापर करावा. प्रतिएकरी 26.6 किलो नत्र, 35.5 किलो स्फुरद आणि 26.6 किलो पालाश द्यावे.पाणी व्यवस्थापन -द्राक्ष काढणीनंतर बागेस पाणी चालू ठेवणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा विश्रांतीच्या कालावधीमध्ये द्राक्ष बागायतदार पाणी देण्याचे बंद करतात. त्यामुळे वेलीवर ताण पडू शकतो. द्राक्ष पक्वतेच्या काळात वेलीतील पांढऱ्या मुळाची वाढ कमी होत जाऊन शेवटी पूर्णपणे थांबलेली असते. विश्रांती काळात पाणीपुरवठा केल्यास पांढऱ्या मुळीची भरपूर वाढ होण्यास मदत होते.कीड व रोगनियंत्रण -- मागील हंगामातील रोगांचा व किडींच्या समस्यांचा विचार करून आतापासून व्यवस्थापन केल्यास पुढील उत्पादनातील फवारण्या कमी करण्यास मदत होऊ शकते.- मागच्या हंगामातील बुरशीचा प्रादुर्भाव आता बागेत नसला तरी त्या रोगांचे जिवाणू, विषाणू बागेत असू शकतात. त्यासाठी द्राक्ष काढणीनंतर पूर्ण बागेस एक टक्का बोर्डो मिश्रण तसेच दीड मि.लि. क्लोरपायरिफॉस प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.द्राक्ष बागेस ताण देणे -द्राक्ष काढणी झाल्यानंतर लगेचच वेलीला पाण्याचा ताण देऊ नये. या वेळी वेलीवरील पाने थोड्याफार प्रमाणात कार्यक्षम असतात. त्यांचा उपयोग वेलीमधील झीज भरण्यासाठी व अन्नसाठा वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो.- परंतु पाच ते सहा दिवसांनी परत वेलीला पाण्याचा ताण द्यावा. जेणेकरून पानांच्या देठावर ऍबसिसिनचा थर निर्माण होईल व वेलीतील अन्नसाठा परत पानांकडे जाणार नाही. काढणीनंतर पानांची कार्यक्षमता पूर्णपणे संपलेली असते. (म्हणजेच ही पाने परावलंबी झालेली असतात.) त्यांच्या पोषणासाठी वेलीतील अन्नसाठा परत वापरला जाऊ नये म्हणून ताण देणे योग्य राहते.- नंतर मात्र नियमित पाणीपुरवठा (कमी प्रमाणात) सुरू ठेवावा.- बरेच द्राक्ष बागायतदार खरड छाटणीला इथेफोन वापरतात. परंतु खरड छाटणीमध्ये पूर्ण काडी काढून टाकली जात असल्याने पानांकडून आलेला अन्नसाठादेखील काडीबरोबर काढला जातो. त्यासाठी इथेफोनचा वापर न करणेच योग्य राहील.- द्राक्ष बागायतदार व द्राक्षतज्ज्ञ यांच्यामध्ये वेलीला ताण कधी द्यावा याविषयी बरेच मतप्रवाह आढळून येतात; परंतु ताण देण्याचा उद्देश हाच असतो, की पानांच्या देठामध्ये ऍबसिसिनथर निर्माण होऊन वेलीतील अन्नसाठा वाचवता यावा.आंतरमशागत -वेलीच्या ओळीमधील जागा व बोद वर्षभरातील कामामुळे पूर्णपणे कठीण किंवा घट्ट झालेले असतात. अशा घट्ट मातीमध्ये मुळांची वाढ होणे कठीण असते. घट्ट झालेले बोद तीन-चार इंच खोदल्यास बोदामध्ये हवा खेळती राहून मुळीच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होईल. बोद खोदताना काही प्रमाणात जुनी झालेली मुळे तुटतात. त्यामुळे नवीन मुळी वाढण्यास सुरवात होते. दोन ओळींच्या मधल्या जागेत किंवा बोदावर ट्रॅक्टरला जोडलेली मशागतीची अवजारे चालत नाहीत. त्यामुळे ही कामे मजुरांद्वारे करावी लागतात. अशा प्रकारे माती मोकळी केल्याचा फायदा साधारण एका महिन्याने बागेत निश्चित दिसून येईल.विश्रांती काळातील तपासणी -मागील उत्पादन काळात आलेल्या अडचणी, चुकांची माहिती व नोंद करणे या विश्रांती काळात गरजेचे असते. एप्रिल छाटणीच्या सुरवातीपासूनच व्यवस्थापनातील महत्त्वाचे मुद्दे सुधारता येतील. विश्रांती काळात वेलीचे निरीक्षण करून त्यांचे आधार पक्के करणे, तसेच खराब झालेले ओलांडे टाकणे यासारखी कामे करावयास हवीत. त्यामुळे छाटणीनंतर योग्य प्रकारे काड्यांना वळविणे शक्य होते. विश्रांती काळात मातीचा नमुना तपासून घेतल्यास वर्षभरामध्ये जमीन सुधारण्यासाठी करावयाच्या कामामध्ये मार्गदर्शक ठरतो. अशा प्रकारे विश्रांती काळात बागेतील कामांचे नियोजनकेल्यास पुढील उत्पादनाच्या दृष्टीने योग्य ठरेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा