खरड छाटणी नियोजन (कामे)
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करताना लागवडीपासूनच शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. यासाठी लागवडीचा प्रकार, रूटस्टॉकचा वापर, खतांचे नियोजन, संजीवकांचा वापर या गोष्टी महत्त्वाच्या ठरतातखरड छाटणीच ऑक्टोबर (गोडी) छाटणीचा पाया असतो. कारण खरड छाटणीचा उद्देश मालकाड्या तयार करून घेणे होय.
मालकाड्यावरील 4 ते 8 डोळ्यांमध्ये सूक्ष्म घडांची निर्मिती होते.प्रथम 10 ते 15 दिवस विश्रांती घ्यावी व नंतर 15 दिवस अगोदर छाटणीपूर्वी बागेस पाणीद्यावे.
नंतर वापसा आल्यावर खोल मशागत करावी. त्यामुळे तणांचा बंदोबस्त होतो व थोड्या प्रमाणात मुळांची छाटणी होते. अशा ठिकाणी नवीन केसमुळे फुटतात. परिणामी अन्नद्रव्ये शोषणाचेप्रमाणही वाढते.
पोषण एप्रिल छाटणी वेळेस सेंद्रिय खताचा वापर एकूण बागेच्या 40 टक्क्यांपर्यंत करावा.
नत्र 40 टक्के, स्फुरद 50 टक्के व पालाश 33 टक्के मात्रा खरड छाटणीपूर्वी द्यावी. (500 किलो नत्र, 250 किलो स्फुरद, 300 किलो पालाश प्रति हेक्टरी) रासायनिक खताबरोबर छाटणीपूर्वी 15 टन चांगले कुजलेले शेणखत सूक्ष्म अन्नद्रव्ये व 30 ते 40 किलो जिवाणू खते चरांमध्ये वेलीच्या दोन्ही बाजूंनी द्यावीत. वरून मातीने झाकून हलकेसे पाणीदेऊन एप्रिल छाटणी करावी
छाटणी करताना गेल्या सिझनमधील वाढलेली फूट एक किंवा दोन डोळे ठेवून छाटणी करावी. शाश्वत घडनिर्मितीसाठी सबकेन पद्धतीचा अवलंब करणे अपरिहार्य असणे यासाठी खरड छाटणीनंतर फूट सात पानांची झाल्यानंतर शेंडा पिंच करतात. त्यानंतर सातव्या डोळ्यातून येणारी फूट पाच पानांपर्यंत पिंचीग करावे. यास 7-5 सबकेन म्हणतात.
सहाव्या डोळ्यामधून येणारी फूट 3 पानांपर्यंत वाढवून पिंचीग करावी. यास डबल सबकेन म्हणतात. यामध्ये शाश्वत सूक्ष्म घडनिर्मिती होते.
छाटणीनंतर 45 ते 60 दिवसांनंतर मालकाड्यावरील डोळ्यांमध्ये सूक्ष्म घडनिर्मिती होत असते. म्हणून द्राक्षामध्ये हा कालावधी पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिशयमहत्त्वाचा असतो.
द्राक्ष बागेस 3500 ते 1100 लिटर पाणी प्रति दिवशी लागते. निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घ्यावयाचे असल्यास 100 चौरस फुटाला साधारण 50 ते 60 काड्या ठेवाव्यात. साधारण एकसारख्या जाडीच्या फुटी ठेवाव्यात.खरड छाटणीमध्ये संजीवकाचा उपयोग महत्त्वाचा आहे.
छाटणीनंतर फुटीवरील नवीन फूट 5 ते 6 पानांवर असताना सायकोशिल 300 ते 500 पीपीएम तीव्रतेची फवारणी करावी. नंतर 6-बी.ए ची 10 पीपीएम तीव्रतेची फवारणी करावी. यामुळे काडीवरील डोळ्यांमध्ये सूक्ष्म घडनिर्मिती होण्यास मदत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा