टोमॅटो

*बीजप्रक्रीया

1) पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम @ 3 gm किंवा कार्बनडॅझिम (बाविस्टिन, सहारा) @ 1 gm / kg ची प्रक्रिया करा.

2) रासायनिक प्रक्रीयेनंतर ट्रायकोडर्माची @ 5 gm / kg प्रक्रिया करा. नंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणी करा.

3) लागवडीआधी रोपांची VAM तसेच नत्र स्थिरिकरण जीवाणू सोबत प्रक्रिया केली असता सुपर फॉस्फेटची 50% तर नत्राचि 25% बचत होते.लागवड पद्धत

*रोपवाटिका तयारी

1)3x1 m आकाराचा गादी वाफा तयार करा.
रोपवाटिका व्यवस्थापन

2)जोरदार पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोपवाटिकेत शेडनेटचा वापर करा.

3)एका महिन्यानंतर शेडनेट काढून टाका. अन्यथा रोपे कमजोर होतात.

4) रोपे उगवल्यावर, रस-शोषक किडनियंत्रणासाठी 10% फॉरेट 10-20 gm/ 10 m 2 या प्रमाणात दोन ओळी मध्ये टाकून हलके पाणी द्या.

5) पुर्नलागवड करण्यापुर्वी 24 तास आधी वाफ्यांना पुरेसे पाणी द्यावे. यामुळेरोपे सहजगत्या उपटता येतात.

*लागवड

1)लागवड करण्याकरिता सरीवरंबे तयार करून दोन ओलीत 75-90 cm आणि दोन रोपात 45-60 cm अंतर राखावे.

2) पुरेसे उत्पादन मिळण्यासाठी सरीवरंबे तयार करण्यापुर्वी मातीत 20 किलो युरिया, 30 किलो डीएपी आणि 20 किलो एमओपी मिसळा.

3) पुर्नलागवड शक्यतो संध्याकाळी करा.

4) मर रोग होऊ नये म्हणून पुर्नलागवडीआधी 2.5 kg ट्रायकोडर्मा, 50 kgचांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून वापरा.

*तण व्यवस्थापन

1)लागवडीनंतरचे 45 दिवस शेत तणमुक्त ठेवा. पुनर्लागवडीनंतर 2-3 दिवसांनी फ्लूक्लोरॅलीन (बसालीन) @ 44 ml / 10 Ltr ची उगवण होण्याआधी फवारणीकरा.

*मशागतीबाबतप्लास्टिकल्चर आणि काटेकोर शेती

1) लो टनेल प्लास्टिक, नेट हाउस तसेच जमीन उन्हात तापवणे यांचा वापर केल्यास निरोगी, रोग मुक्त रोपे मिळतात. तसेच पाने वळणा-या विषाणूचा प्रतिबंध होतो.

2) विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपवटिकेत नायलॉन जाळ्या उभारा. नंतरच्या काळात लागणारी कीटकनाशाकांवरील खर्च कमी होऊन 1500 Rs / acre ची बचत होते. (40 मेश साइज़)

3) पेरणी झाल्यावर 400 मेश नायलॉन नेट किंवा 2 m उंचीचे पांढरे कापड गादीवाफ्यावर मच्छरदाणी सारखे लावा. किडीचा बंदोबस्त होतो.

4) काळ्या प्लास्टिक आच्छादनाचा वापर केल्यास रोपांची वाढ चांगली होते. तसेच नेहमीच्या पद्धतीने मिळणा-या उत्पादनापेक्षा 8% नि अधिक उत्पादन मिळाले

*पिकाचे पोषणसेंद्रिय खते

1) संशोधन. वेगवेगळ्या खतांच्या मात्रा घेऊन केलेल्या प्रयोगामध्ये सर्वात जास्त उत्पन्न 50%RDF ( शिफारशी प्रमाणे खत मात्रा ) + 50% शेणखत + जैविकखताच्या वापराने मिळाले.

2) पावसाळ्यात  सूत्रकृमी  तसेच  अळयांचा  प्रादुर्भावाची शक्यता असते. यावर करंज, नीम पेंड 40 kg / acre शेवटच्या नांगरणीच्या वेळी जमिनीत घाला

3) ट्रायकोडर्मा बुरशीच्या वाढीसाठी दर महिन्याला शेणखत प्रती झाड खोडाजवळ मिसळून द्या. आजूबाजूच्या पीकाताही 5 kg / ha शेणखतात मिसळून घाला.

*रासायनिक खते

1) पिकाला संपूर्ण कालावधीत नत्र:स्फुरद:पालाश@80kg:40 kg:40 kg प्रती एकर (175kg युरीया, 250 kg SSP आणि 68kg MoP/एकर) द्या.

2) नत्राची अर्धि मात्रा आणि संपूर्ण स्फुरद व पालाश पुर्न-लागवडीच्या वेळी द्या.

3) नत्राचा उरलेला हफ्ता, तीन समान हफ्यामधे 20दिवसाच्या अंतराने द्या.

*फर्टिगेशन

1) रोपाच्या लावणीपासून ते वाढीपर्यंत 19:19:19@1.5kg/acre/दिवस, 10 दिवस द्या

2) फुल ते फलधारणा होईपर्यंत 12:61:00@0.4kg/acre/दिवस, 10 दिवस , 13:00:45@0.6kg/acre/दिवस 15दिवस आणि Urea@0.8kg/acre/प्रती दिवस 20 दिवस द्या

*विद्राव्य खते फवारणी

1) खत व्यवस्थापन. लागवडीनंतर 10-15 दिवसात 19:19:19 आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये @ 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारा.

2) लागवडीनंतर 40-45 दिवसांनी २० टक्के बोरॉन 1 ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारा.

3) फुले धरण्यापूर्वी पाण्यात विरघळणारे 12:61:00 ( मोनो अमोनियम फॉस्फेट ) 10 gm / लिटरच्या फवा-याने उत्पादन वाढ मिळते.

4) पिक फुलोरा अवस्थेत असताना 0:52:34 @ 4 ते 5 ग्रॅम + मायक्रोन्युट्रीएंटस् @ 2.5-3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारा.

5) फळधारणा अवस्थेत असताना 0:52:34 @ 4 ते 5 ग्रॅम + बोरान @ 1 gm / Ltr पाण्यात मिसळून फवारा.6) फळे तयार होण्याच्या काळात 13:0:45 @ 4-5 ग्रॅम + कॅल्शियम नायट्रेट @ 2-2.5 gm प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारा.

*अन्नद्रव्यांची कमी

1)फुलो-याच्या कुजीमुळे फळांवर काळे डाग दिसतात ते ब-याचदा कॅल्षियम कमतरतेने येतात.आयत्या वेळी 2 gm / Ltr कॅल्षियम नायट्रेट पाण्यात घालून पानांवर फवारा.

*पीक संजीवके

1) निरोगी, मजबूत रोपनिर्मिती आणि पुनर्लागवडीचा ताण सहन करण्यासाठी लिहोसिन @ 1 ml / Ltr ची लागवडीनंतर 20 दिवसांनी फवारणी करा.

2) जास्त तापमानामुळे फुलांची गळ- पीक फुलावर आल्याबरोबर एनएए ( 50 पीपीएम )50g प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यानंतर दुसरी फवारणी 20 ते 25दिवसांनी द्यावी.

*सिंचन

सिंचनाच्या पाळ्यापिकाला बेताचे परंतु सारख्या प्रमाणात पाणी गरजेचे. जास्त किंवा कमी झाल्यास फुलगळ होते. आच्छादनाने मुळीजवळ थंडावा राहतो.सिंचनास महत्वाच्या अवस्थाफुलोरा व फळाचा विकास हे महत्त्वाचे टप्पे आहेत. म्हणून त्या काळात पाण्याचा ताण न देता वारंवार पाणी द्यावे

*संशोधन.

ठिबक सिंचनातून योग्य पाणी पुरवठा व युरियाचे 8-10 वेळा योग्य हफ्ता दिल्यास 67.73-69.38 टन / हेक्टरी इतेक उत्पन्न मिळू शकते.

*कीड नियंत्रण

1)कोळी.

कोळीचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण अबामेक्टीन ( अफर्म, अग्री- मेक ) @1-2 ml / Ltr किंवा फेनाझाक्विन (मॅजिस्टर, डीई 436) @ 1 ml / Ltr फवारा.नागअळी

2)नागअळी

(1)  नागअळीचा प्रादुर्भाव जाणवल्यास डायमेथोएट 30EC ( रोगर ) @ 15 ml किंवा स्पिनोसॅड ( सक्सेस, ट्रेसर ) @ 5 ml प्रती 15 Ltr पाण्यात मिसळून फवारा

(2) नाग अळीचा प्रादुर्भाव असल्यास पानांची अन्न  तयार करण्याची क्षमता कमी होते. फळांचे उत्पादन  खालावते. ट्रायझोफॉस (टारझन 40, ट्रायझोसेल ) @ 2ml / Ltr फवारा.

3 )फळ पोखरणारी अळी

(1) टोमॅटोच्या 16 ओळीनंतर झेंडूच्या रोपाची एक ओळ लावा.त्यामुळे फळपोखर अळीचा प्रादुर्भाव कमी होऊन कीटक नाशकाचे फवारे कमी लागतात (17 ऐवजी 8 फवारे). सरासरी 4734 Rs / ha ची बचत होते.

(2) फळपोखर किडीच्या नियंत्रणासाठी 16 कामगंध सापळे / एकर समान अंतरावर पुर्नलागवडीनंतर 20 दिवसांनी लावा. 20 दिवसाच्या अंतराने त्यातील द्रव बदलत रहा.

(3) हेलिकोवेर्पा ( फळपोखर कीड ) मुळे पिकाचे सुमारे 22-37% नुकसान होते. नियंत्रणासाठी सुरवातीच्या काळात गोमुत्र आणि नीम युक्त रसायने वापरल्यास याचे प्रमाण बरेच कमी होते.

(4) 10 दिवसांच्या अंतराने संध्याकाळी दोनदा हेक्टरी 250 एलइ दराने एचएएनपीव्ही फवारल्यास टोमॅटोच्या फळपोखर अळीचा बंदोबस्त होतो

(5) फळपोखर अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भावित फळे नष्ट करा. जास्त प्रादुर्भाव असल्यास स्पिनोसॅड ( सक्सेस, ट्रेसर ) @ 6 ml / Ltr + स्टीकर @ 5 ml / 10 Ltr पाण्यातून फवारा.

(6) आगामी काळात पिकावर फळपोखर किड आणि मररोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रतिबंध. मॅन्कोझेब 25 gm किंवा टॅबूकोनॅज़ोल 5-10 ml / 10 Ltr पाण्यातून फवारा.

3)पांढरी माशी

(1) चुरडा- मुरडाची लागण झालेली रोपे त्वरित नष्ट करा. पांढ-या माशीचा प्रसार रोखण्यासाठी इमिडाक्लोप्रीड ( कॉनफ़िडॉर, टाटामीडा ) @ 0.5 ml / Ltr पाण्यात मिसळून फवारा.

(2) अॅसीटामिप्रिड ( प्राइड, अॅसिलॉन ) @ 4 gm / 10 Ltr पाण्यामध्ये मिसळून 10दिवसाच्या अंतराने 2दा फवारा.

4)पाने खाणारी अळी

(1)पाने खाणा-या अळीच्या नियंत्रणासाठी 20 gm कार्बारील 50WP किंवा 20 ml क्लोरपायरीफॉस (स्काउट, ट्रिसेल) / 10 Ltr पाण्यात + 10 ml स्टिकर मिसळून फवारा

5)फुलकिड

(1)फुलकिडीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी फीप्रोनिल ( जंप, कॉम्बॅट, फ्रंटलाइन ) @ 25 gm / acre प्रती10 Ltr पाण्यामध्ये मिसळून फवारा.

(2) स्पिनोसॅड ( सक्सेस, ट्रेसर ) @ 160 ml / acre प्रती 350Ltr पाण्यामध्ये मिसळून फवारा.

6)मावा आणि तुडतूडे

(1)मावा आणि तुडतूडे नियंत्रणासाठी डायमेथोएट 30EC ( टिका, रोगर ) @ 15 ml / 10 Ltr ची पाण्यात मिसळून, आकाश स्वछ असताना फवारणी करा.

*रोग नियंत्रणमररोग

1) रोपवाटिके मध्ये मररोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वाफे कार्बनडॅझिम ( बाविस्टिन, झेन, सहारा ) 50%WP @ 15-20 gm / 10 Ltr द्रावणाने भिजवा.

2) मर रोगनियंत्रण. रोपांची गर्दी टाळा. माती मध्ये वाफसा ठेवा. मर आढळून आल्यास मेटॅलॅक्सिल ( रीडोमील ) @ 2.5 gm / Ltr ची 2-3 वेळा फवारणी करा.

3) सर्व काळजी घेवून सुद्धा रोपवाटिकेत मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कॉपर ओक्सीक्लोराईडची @ 3 gm / Ltr याप्रमाणात भीजवणी करा.

*लेट ब्लाइट

1) करपा व लेट ब्लाइट चा प्रादुर्भाव. क्लोरोथॅलोनील ( कवच, जटायु ) @ 25gm / 10 Ltr पाण्यात मिसळून फवारा. गरजेनुसार 15 दिवसांनी दुसरी फवारणी घ्या.

2) ढगाळ हवामानामुळे करपा व उशिरा येणारा करप्याची शक्यता. मॅन्कोझेब @ 2.5 gm / Ltr किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड @ 2.5 gm / Ltr पाण्यात मिसळून फवारा.

3) करप्याचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी,प्रॉपिकॉनाझोल ( रडार, टिल्ट ) किंवा हेक्साकोनॅझोल (कॉंन्टाफ, सितारा) @ 1 ml / Ltr पाण्यात मिसळून फवारा.

4) सध्याच्या पावसाने करपा आणि अन्य रोगांची शक्यता वाढते. नियमित कॉपर युक्त बुरशींनाशके 2 gm / Ltr + स्ट्रेप्टोसायक्लीन 2 gm / 10 Ltrपाण्यात मिसळून फवारा

*करपा

1) पिकात अंतर ठेवणे, रोपाना  आधार देऊन आजूबाजूला पसरू न देणे  आणि पिकात योग्यहवा खेळती राहणे रोग न पसरण्यासाठी महत्वाचे असते.

2) करपा. मॅन्कोझेब 75 WP 1500-2000 gm / 750 Ltrपाण्यात किंवा सायमोक्झॅनिल + मॅन्कोझेब 72 WP @ 1520 gm / 500 लिटर पाण्यात मिसळून फवारा.

*TLCV (पाने वळणारे विषाणू)

मुख्य पिकाभोवती 5-6 ओळी मका. ज्वारी, बाजरीच्या सापळा पीक म्हणून लावा. ही पिके पाने वळणा-या विषाणूपासून संरक्षण करतात.

*भुरीरोग

भुरीरोगाचा प्रादुर्भाव, 10 दिवसांच्या अंतराने दोनदा डिनोकॅप ( कॅराथेन ) @ 1 gm / लि किंवा वेटेबल सल्फर @ 3 gm / लि पाणी फवारल्यास बंदोबस्त होईल

*करपा व फळसड

1) ढगाळ व पावसाळी हवामाना मुळे करपा व फळ सड चा प्रादुर्भाव, झाडावरील व जमिनीवरील रोग ग्रस्त पाने व फळे गोळा करून नष्ट करा.

2) फळसड व करपा. मॅन्कोझेब 25 gm / कॉपर ओक्सीक्लोराईड 30 gm किंवा क्लोरोथॅलोनील (कवच, जटायु) 25 gm / 10 Ltr पाणी, 15दिवसाच्या अंतराने आलटुन पालटून फवारा.

*स्पॉटेड विल्ट व्हायरस

स्पॉटेड विल्ट व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी इमीडाक्लोप्रिड ( कॉनफ़िडॉर, टाटामीडा ) किंवा फिप्रोनिल ( रिजेन्ट, सरजेंट ) @ 0.5 ml / Ltr पाण्यात मिसळून फवारा.

*ठिपका रोग

ठिपका रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे. नियंत्रण. मॅन्कोझेब 1250 g प्रती 500 L पाण्यात  मिसळून फवारावे.
अन्य समस्यामातीतून येणा-या रोगांसाठी बोर्डोमिश्रणाची @ 10 gm / Ltr किंवा कार्बेन्डॅझीम @ 1 ml / Ltr भिजवणी करा.

1 महीन्याने 2 kg / acre ट्रायकोडर्मा + 100 kg शेणखत खोडाजवळ मिसळा.

मुळावरील बुरशीसाठी जमीनीतून 1% युरिया (10 gm / Ltr) व 0.25% कॉपर ऑक्सीक्लोराईड (2.5 gm / Ltr) पाण्यातून झाडाभोवती फवारणीयंत्राचे नॉझल काढून द्रावण द्या.

*काढणी आणि नंतरचे तंत्र

योग्य वेळ आणि तंत्रफळांचा 1/4 भाग पक्व झाल्यावर टोमॅटोची काढणी करू शकता.
स्थानिक बाजार पेठ व दैनदिन वापरासाठी पूर्ण पक्व (फळ लालसर) झाल्यावर काढणी करा.
प्रतवारी आणि वर्गवारीकाढणी नंतर फळांची प्रतवारी करा. चिरलेली, डागाळलेली आणि वेडवाकड्या आकाराची फळे बाजूला करा

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट