भेंडी
भेंडी
*पीक नियोजन
1)चांगले उगवण क्षमतेचे, चांगल्या प्रतीचे आणि प्रमाणित बियाणे वापरा. आपल्या क्षेत्रानुसार शिफारशी केलेल्या वाणांचा वापर करा.
2)भेंडी हे उष्ण हवामानात येणारे पीक आहे. ते 22 ° से पासून 35 ° से तापमानात घेतले जाते. भेंडी पिक दंव आणि 12° से पेक्षा थंड हवामानाला संवेदनाक्षम आहे.
*पेरणी तंत्रजमिनीची तयारी
चांगल्या वाढीसाठी व विकासासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. प्रथम जमिनीची नांगरट करून ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर उभ्या-आडव्या दोन कुळवांच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. त्यानंतर जमीन सपाट करून घ्या. पिकाला चांगली भुसभुशीत जमीन लागते.
*जाती
सुधारित जाती:पंजाब पद्मिनी,परभणी क्रांती,पी-7,अर्का अनामिका,अर्का अभय,काशी प्रगती,काशी विभूती या लोकप्रिय जाती आहेत.2. संकरीत जाती:वर्षा, विशाल, विजय, शितला ज्योती, शितला उपहार, सोनी-1001, क्लासिक-1002, मरवल-1003, क्रीष्मा-1004, प्रभाव-225, मरदुला-251, एमएएचवाय-64, भिंडी नं.-10, एमएएचवाय-55, माह्य-28, ओएच-016, ओएच-152
*बिज प्रक्रिया
1)चांगली उगवण होण्यासाठी व उगवणीचा कालावधी 10 दिवसांपेक्षा कमी करण्यासाठीपेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्यात भिजत ठेवा.बियाणे सुकल्यावर त्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया करा.
2)चांगली उगवण होण्यासाठी व सुरवातीला येणाऱ्या रोगांच्या बचावासाठी बियाणे चांगले सुकल्यावर कार्बेनडाझिम 12%+ मॅनकोझेब 63%WP (सिक्सर,साफ)2gm प्रती किलो बियाणे याप्रमाणात बिज प्रक्रिया करा.
*पेरणी आणि लागवड पद्धती
1)उन्हाळी हंगामात पिकाची लागवड जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मार्चच्या मध्यापर्यंत करावी.
2) पावसाळी हंगामात पिकाची लागवड जुन-जुलै महिन्यात करावी.
3)उन्हाळी हंगामात लागवड करताना दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. व दोन झाडातील अंतर 20 सें.मी. ठेवावे.
4) पावसाळी हंगामात लागवड करताना दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. व दोन झाडातील अंतर 50 सें.मी. ठेवावे.
*बिज दर:
उन्हाळी हंगामात पेरणीसाठी प्रती एकर 5-7 किलो बियाणे लागते आणि पावसाळी हंगामात 3-4 किलो बियाणे प्रती एकर लागते.
*तण व्यवस्थापन
1)तण नियंत्रण:लागवडी/पेरणीनंतर लगेच परंतु पिक उगवण्यापूर्वी पेंडीमिथालीन 30 EC (स्टॉंम्प,धानुटॉप)150ml/15Ltr पाण्यातून फवारा.
2) उभ्या पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30-35 दिवसांनी एकदा कोळपणी करावी.मशागततणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 25-आणि 45 दिवसांनी कोळपणी करावी.
*पीक-पोष
1)सेंद्रीय खते, आणि जैविक ख
ते1. 5-6 टन कुजलेले शेणखत प्रती एकर जमिनीच्या मशागतीच्या वेळेस द्यावे.2. चांगल्या वाढीसाठी व उत्पादनासाठी सेंद्रिय खते 4 टन+ 6 किलो अझोटोबॅक्टर+ 6 किलो पीएसबी कल्चर प्रती एकर पेरणीपूर्वी किंवा शेत तयार करताना द्यावे.
2)रासायनिक खते
(1)चांगल्या वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया),20 किलो स्पुरद (125 किलो एसएसपी) व 20 किलो पालाश (34 किलो एमओपी) प्रती एकर लागवडीपूर्वी सरीमध्ये टाकावे
(2)चांगल्या वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया) प्रती एकर लागवडीनंतर20 आणि 45 दिवसांनी द्यावे.
*पाण्यात विरघळणा-या खतांचे वेळापत्रक
1). चांगल्या वाढीसाठी लागवडीनंतर 20-25 दिवसांनी 19:19:19 5gm/Ltr पाण्यातून फवारा.
2) चांगल्या फुलधारणा व फळांचा विकास होण्यासाठी फुलो-यापूर्वी 19:19:195gm/Ltr आणि 0:52:34 5gm/Ltr पाण्यातून फळे तयार होताना फवारा.
*अन्नद्रव्ये कमतरता
1)लागवडीनंतर 30-40 दिवसांनी झिंकची कमतरता दिसून येते.पाने पिवळी पडून गळतात.नियंत्रणासाठी झिंक EDTA 12% 100gm एकरी 200Ltr पाण्यातून फवारा.संप्रेरके1.चांगल्या वाढीसाठी व उत्पादनासाठी धनझायीम गोल्ड 5 किलो किंवा ट्राइकॉंन्टनॉल 0.1% EW (विपुल) 5 किलो प्रती एकर मुख्य खतांसोबत द्यावे.
2) राल्लीगोल्ड 5 किलो किंवा धनझायीम गोल्ड 5 किलो प्रती एकर लागवडीनंतर 25 दिवसांनी जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावे.
3)चांगल्या वाढीसाठी व उत्पादनासाठी बायोविटा 8 किलो किंवा ट्राइकॉंन्टनॉल (विपुल,क्रिगोल्ड) 10 किलो लागवडीनंतर 30-35 दिवसांनी द्यावे.
4) चांगल्या वाढीसाठी व उत्पादनासाठी प्लँट हेल्थ डेव्हलपर (ऑरा XL) 250ml+सूपर स्प्रेडर (मॅझिक ड्रॉप)40ml 150Ltr पाण्यातून प्रती एकर पिक फळधारणा अवस्थेत असताना फवारा.
*सिंचन
सिंचन वेळापत्रक
1.उन्हाळी हंगामात पिकाला 5-6 दिवसाच्या अंतराने पाणी द्या.
2.पावसाळ्यामध्ये पिकाची पाण्याची गरज पाहून पाणी द्यावे.महत्वाच्या अवस्थापिकाच्या या अवस्थांमध्ये पाणी दिले गेले पाहिजे,अन्यथा उत्पादनावर परिणाम होवू शकतो:
(1). पेरणी/लागवडीनंतर लगेच
(2) फुलो-यापूर्वी.
(3)फळधारणा झाल्यावर.
*कीड नियंत्रण
1)फुलकिडे आणि मावा
फुलकिडे आणि मावा नियंत्रणासाठी इमीडाक्लोप्रिड70WG(अॅडमायर,अॅडफायर) 5gm किंवा इमीडाक्लोप्रिड 17.8SL (मीडीया,कॉनफिडोर) किंवा थायामेथोक्सॅम (मॅक्सिमा,अरेवा,अक्टारा) 10 gm/15 Ltr पाण्यातून 12 दिवसांच्या अंतराने 2 वेळा फवारा.
2)कोळी
कोळी या किडीमुळे उत्पादनात 35% घट होवू शकते.नियंत्रणासाठी स्पीरोमेसिफेन 22.9SC (ओबेरोन,वोल्टेज) 20ml किंवा प्रोपारगाईट 57EC (ओमाइट,सिंबा) 40ml/15Ltr पाण्यातून फवारा
3)खोड आणि फळे पोखरणा-या अळ्या
खोड आणि फळे पोखरणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 40% + सायपर मेथ्रिन 4% (रॉकेट, प्रोफेक्स सूपर) 350ml किंवा प्रोफेनोफॉस 50% EC400ml /200Ltr पाण्यातून प्रती एकर फवारा.किंवाखोड आणि फळे पोखरणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट(प्रोक्लेम EM-1) 5% SG 7gm किंवा क्लोरॅंट्रॅनीलिप्रोल 18.5%SC(कोरॅजन) 6ml किंवा फ्लूबेनडामाइड 39.9SC (फेम) 5ml किंवा फ्लूबेनडामाइड 20WG(फ्लूटॉन टाकूमी)@10gm/15Ltr पाण्यातूनफवारा.
4)पांढरी माशीपांढ-या माशीमुळे उत्पादनात 40% घट होते व विषाणुजन्य रोगांचा प्रसार होतो.नियंत्रणासाठी अॅसीटामिप्रिड 20SP (धनप्रित, रेकॉर्ड) 5gm किंवाडायफेनथीरॉन 50WP(पेगासास,पोलो) 20gm/15Ltr पाण्यातून फवारा
*रोग नियंत्रण
1)भुरी
भुरी या रोगामध्ये पानांवर पांढरी भुकटी दिसून येते नियंत्रणासाठी गंधक 500gm प्रती एकर 200Ltr पाण्यातून फवारा.
2)रोप मर
(1)थंड,ढगाळ हवानाम,उच्च आर्द्रता ओळी माती व रोपांची गर्दी यामुळे मर रोग येण्याची शक्यता आहे
(2)मर रोगामध्ये पिक पूर्णपणे मरून जाते.
(3)मर रोग नियंत्रणासाठी मेटालेक्सील 8%+ मॅनकोझेब 64%WP (रीडोमीनMZ,कॉरोमील) 2gm/Ltr पाणी याप्रमाणे पेरणीपूर्वी भिजवणी करा.
3)केवडा
(1)YVMV हा पिकातील मुख्य विषाणूजन्य रोग आहे.
(2)हा रोग पिकाच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येवू शकतो व त्याने पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होतो.
(3)हा रोग पांढ-या माशीमुळे होतो.
(4)या रोगाला बळी पडलेली झाडे उपटून टाका व रोगाला प्रतिकार करणा-या जातींची निवडकरा.
(5)पांढ-या माशीचे नियंत्रण करून YVMV या रोगाचे नियंत्रण करू शकता.
4)इतर समस्यापिवळेपणापिवळेपणा कमी करण्यासाठी प्रोपिनेब 70WP 35gm+19:19:19 75gm/15 Ltr पाण्यातून फवारा.
5)सुत्रकृमी
(1) सुत्रकृमी मुळे मुळ्यांची वाढ थांबते व उत्पादनावर परिणाम होतो.
(2) सुत्रकृमी नियंत्रणासाठी कार्बोफ्युरान 3G (फ्युराडन,डाइफ्युरान फ्युरी)@10-15kg/एकर प्रदुर्भावाच्या तीव्रतेनुसार वापरा.
*कापणी आणि काढणी पश्चात तंत्रयोग्य अवस्था
आणि तंत्रफळांची काढणी
फळे हिरवी,टवटवीत व त्यामध्ये बियांचे प्रमाण कमी असताना करा.
*प्रतवारी
(1)फळांच्या काढणीनंतर त्यांची साठवण सावलीत करावी.
(2)फळांची प्रतवारी करताना त्यामधील रोगट व कुरूप फळे काढून टाका.
(3) फळे बाजारपेठेत पाठवण्यापूर्वी त्याच्या आकारमानानुसार वर्गवारी करा.
*प्रक्रिया आणि मूल्यवर्धित
(1)स्थानिक बाजारपेठेत फळे पाठवण्यापूर्वी ती टोपलीत किंवा गोणी मध्ये व्यवस्थितभरून पाठवा.
(2)निर्यातीची फळे 2.5-5kg बॉक्स मध्ये पॅक करा.
(3) साठवणुकीमध्ये भेंडीची फळे 95% आर्द्रतेत व 7-10 ° से. तपमानाला 8-10 दिवस टिकू शकतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा