पालाश आणि मॅग्नेशियमचे

*चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पालाश आणि मॅग्नेशियमचे व्यवस्थापन

उपलब्ध पालाश आणि मॅग्नेशियम चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात दिसून येतात. कारण या जमिनी तयार होत असतानाच खनिजांची झीज होऊन विनिमयक्षम पालाश आणि मॅग्नेशियमची भर पडते. कमी पावसामुळे पाण्याद्वारेही अन्नद्रव्ये वाहून जात नाहीत. परंतु मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पालाश या अन्नद्रव्यामध्ये असमतोल होऊन मॅग्नेशियम व पालाशची कमतरता पिकांमध्ये दिसून येऊ शकते. याचे प्रमुख कारण जमिनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण, पालाश व मॅग्नेशियमपेक्षा  जास्त असल्यामुळे   मॅग्नेशियम व पालाशचे शोषण कॅल्शियमच्या तुलनेत कमी होते आणि पिकांमध्ये या मूलद्रव्यांची कमतरता दिसून येते.
द्राक्ष पिकामध्ये पालाश आणि कॅल्शियम
एकमेकांच्या विरुद्ध कार्य करतात. यामध्ये पालाशचे शोषण कमी होते व द्राक्ष मण्यांना पालाशचा पुरवठा कमी झाल्याने द्राक्ष मणी जास्त आम्लधर्मी होतात.
- चुनखडीयुक्त जमिनीत लोहाच्या कमतरतेचा अनिष्ट परिणाम कमी करण्यासाठी लोहाची (१ ते २ टक्के) फवारणी फायदेशीर आहे.
- गंधक आणि गंधकयुक्त पदार्थाचा वापर करावा. त्यातून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
- सेंद्रिय पदार्थांचा- उदा. कंपोस्ट, शेणखत इत्यादी- वापर केल्याने चुन्याची दाहकता कमी होऊन अन्नद्रव्य उपलब्धतेमध्ये वाढ होते.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट