कांदे
*पेरणीचे तंत्रपीक नियोजन
1) दाळवर्गीय पिके घेतल्यानंतर कांद्याचे पीक घेतल्यास चांगले उत्पन्न मिळते तसेच पिकाला पोषणद्रव्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात.
2) संशोधन: पट्टा पद्धतीतील उसात कांद्याचे आंतरपीक बटाटा, लसूण आणि कोबीपेक्षा जास्त उपयुक्त ठरते. ऊस लागवडीचा सर्व खर्च कान्द्यातून निघाला. ऊस लागवडीच्या वेळी कांद्याची लागण करावी.
3) ऊस-कांदा आंतरपीक ठिबकने घेतल्यास पाण्याची 25-30% बचत होते.जमीन तयार करणेठिबक अथवा तुषारचा वापर आणि रुंद सरी आणि गादी वाफे पद्धत करून रोपे लावणीस तयार ठेवल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते.
3)रुंद वाफा सरी पद्धत. यात रुंद वरंब्याचे गादी वाफ्यात रुपांतर करून लागवड केली जाते. यामुळे योग्य निचरा आणि कमी प्रमाणात रोग येतात.
*जाती
1) खरीफ हंगाम: N-53, बसवंत 780, अग्री डार्क रेड, भीमा राज, भीमा सुपर,भीमा रेड, भीमा डार्क रेड, भीमा शुभ्रा.2) रबी हंगाम: N-2-4-1, फुले सफेद, फुले सुवर्णा, पुसा रेड, पुसा व्हाईट राउंड, अग्रीफाउंड लाइट रेड, अग्रीफाउंड व्हाईट, भीमा राज, भीमा किरण, भीमा शक्ति,अर्का निकेतन3) रांगडा कांदा (लेट खरीफ): N-2-4-1, फुले सूवर्णा, फुले समर्थ, पुसा रेड, अग्रि लाइट रेड, भीमा राज, भीमा सुपर, भीमा रेड, शक्ति, अर्का निकेतन
*)बीजप्रक्रीया
1) कांद्याच्या बियाण्याला प्रति किलो 2 gm ट्रायकोडर्मा विरिडे हा जैविककारक चोळल्यास कोवळ्या रोपांना होणारे रोग व मातीतून होणारा संसर्ग कमी होतो
2) कांद्याच्या बियाण्याला 2 ग्रॅम थिरम / कि + 1 ग्रॅम बेनोमाइल 50 डब्लूपी / लि पाणी चोळल्यास ओलीमर व काणी रोगांचा नीट बंदोबस्त होतो.
3) पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3 gm किंवा कार्बनडॅझिम ( बाविस्टिन, सहारा) 1 gm / kg ची प्रक्रिया करा.कांद्याची रोपमुळे 25 ml / 10 Ltr कार्बोसल्फान मध्ये 2 तास बुडवून लावल्यास 30 दिवस पिकाचे संरक्षण होते
*लागवड पद्धत
1)ठिबक अथवा तुषारचा वापर आणि रुंद सरी आणि गादी वाफे पद्धत करून रोपे लावणीस तयार ठेवल्यास उत्पादन वाढण्यास मदत होते.
2)रुंद वाफा सरी पद्धत. यात रुंद वरंब्याचे गादी वाफ्यात रुपांतर करून लागवड केली जाते. यामुळे योग्य निचरा आणि कमी प्रमाणात रोग येतात.
3) रोपवाटिका तयारी. 3x1 m आकाराचा गादी वाफा तयार करा. बियाण्याची उगवण क्षमता 70% धरल्यास 1.25 ते 1.5 kg बियाणे प्रती एकर साठी पुरते.
4) बियाणे पेरताना काळजी घ्या. ( 5 gm / m 2 प्रमाणात फोकून / ओळीत पेरा ).पेरणी दाट झाली तर रोपे बारीक राहतात. गर्दी झाल्यामुळे आद्रता वाढते, पाने सडतात व मर रोगाचा प्रादुर्भाव होतो.
5) पुनर्लागवडीसाठी 10x15 cm अंतर वापरा. लागवडीच्या वेळी ती अंगठ्याने दाबू नका तसे केल्यास माना वाकड्या होतात व वाढीस वेळ लागतो.
*रोपवाटिका व्यवस्थापन
1) रोपे उगवल्यावर, रस-शोषक किड नियंत्रणासाठी 10% फॉरेट @ 10-20 gm / 10 m 2 या प्रमाणात दोन ओळी मध्ये टाकून हलके पाणी द्या.
2) पेरणी झाल्यावर 400 मेश नायलॉन नेट किंवा 2 m उंचीचे पांढरे कापड गादीवाफ्यावर मच्छरदाणी सारखे लावा. किडीचा बंदोबस्त होतो.
3) जोरदार पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोपवाटिकेत शेडनेटचा वापर करा. एका महिन्यानंतर शेडनेट काढून टाका.अन्यथा रोपे कमजोर होतात.
4) रोपवाटीकेतील मररोग नियंत्रण. थायरम @ 5gm / चौ.मि. मातीप्रक्रिया करा. रोपात पाणी साचु देऊ नये5) पुनर्लागवडीसाठी रोपे उपटताना मुळे तुटणार नाहीत याची काळजी घ्या. रोप उपटण्यापूर्वी 24 तास आधी वाफ्याना चांगले पाणी द्या
.तण व्यवस्थापन
1) पुर्नलागवडीच्याआधी, फ्लूक्लोरॅलिन 45 EC @ 40 ml / 10 Ltr ची फवारणी करा. 40 दिवसांनी हाताच्या सहायाने तणांची बेणणी करा.
2) चांगल्या वाढीसाठी व उत्पादनासाठी लागवडीनंतर 25-30 दिवसांनी 1 ली,40-45 दिवसांनी 2 री खुरपणी करा.हलके पाणी देत राहा.
*मशागती बाबत प्लास्टिकल्चर आणि काटेकोर शेती
1) पेरणी झाल्यावर 400 मेश नायलॉन नेट किंवा 2 m उंचीचे पांढरे कापड गादीवाफ्यावर मच्छरदाणी सारखे लावा. किडीचा बंदोबस्त होतो.
2) जोरदार पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोपवाटिकेत शेडनेटचा वापर करा. एका महिन्यानंतर शेडनेट काढून टाका. अन्यथा रोपे कमजोर होतात.
*पिकाचे पोषणरासायनिक खते
1) रोपवाटिकेतील रोपांना तीन आठवड्याने 2.5 kg नत्र द्या. पुनर्लागवडीच्याआधी हळूहळू पाणी तोडा यामुळे रोप मजबूत बनतात व पुनर्लागवडीत टिकाव धरतात.
2) लावणी: नत्राचे वरखत दोन भागात देताना पहिला भाग लावणीनंतर 30 दिवसांनी व दुसरा 45 दिवसांनी द्यावा3) नत्र व पालाशसोबत स्फुरदसाठी म्यूरेट ऑफ पोटॅश ऐवजी सल्फेट ऑफ पोटॅश @ 100 kg / ha दिल्याने उत्पादन सर्वाधिक मिळाले. शिवाय 6 महिन्यांच्या साठवणुकीत सर्वात कमी (26%) कांदा नासला.
विद्राव्य खते
1) लागणीच्या 10 ते 15 दिवसांनी 19:19:19 चा एक फवारा 2-3 gm / Ltr सोबत सूक्ष्म अन्नद्रव्याचा फवारा @ 2-3 gm / Ltr पाण्यात मिसळून फवारा.
2) चांगल्या प्रतिचे कांदे मिळण्यासाठी 12:61:00 ( MAP ) @ 5 gm / Ltr चा एक फवारा, पेरणीनंतर 50-60 दिवसांनी किंवा पुर्नलागवडीनंतर द्या.
3) कंद फुगायला लागले की 8 gm / Ltr कॅल्षियम नाइट्रेटचे 2 फवारे 10 दिवसांच्या अंतराने दिल्यास चांगला दर्जा व कन्दाचा विकास होतो.
4) कंद बनू लागण्यापूर्वी ( पेरणीनंतर 35 दिवसांच्या आत ) नत्राचे वरखत देऊनव्हायला हवे, म्हणजे कंदांना खतांची इजा होणार नाही
5) शिफारशी प्रमाणे रासायनीक खताच्या वापरा सोबत 8 kg / acre ह्युमिक असिडचा उपयोग केल्यास चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.
6) संशोधन. काढणीपुर्वी 10 दिवस o.2 gm / Ltr स्ट्रेप्टोसाइक्लिन आणि 1 gm / Ltr कार्बेंडॅझीमचे ( बाविस्टिन ) फवारे दिल्याने काढणीनंतरची नासाडी कमी झाली.
*अन्नद्रव्यांची कमी
1) पानावर पिवळसर ठिपके आढळून येत आहेत,झिंकची कमतरता असू शकते. कमतरता भरून काढण्यासाठि EDTA झिंक 15% ( रेक्सोलिन ) 1 gm / Ltr पाण्यात मिसळून फवारणी करा
2) थंडीमुळे पिकाची वाढ मंदावली आहे तेथे 19:19:19 चा 3 gm प्रती लिटरचा फवारा द्या. मुळया जवळची माती भुसभुशीत राहू द्या, वाफसा राहू द्या.
*पीक संजीवके
1) माना पडण्यापूर्वी कांद्याच्या पातीवर मॅलिक हायड्राझाईड 2500-3000 ppm ( 0.25-0.3 gm / Ltr ) फवारल्यास कोंब फुटण्यास प्रतिबंध होतो. वजनात घट कमी येते.
2) 100 दिवस झाल्यावर पाणी बंद करतात. पात खुप हिरवीगार, माना जाड असतील, तरक्लोरमेक्वॉट क्लोराईडची ( Cycocel ) 500-1000 mg / Ltrएक फवारणी घ्या.
*सिंचन
सिंचनाच्या पाळ्या
1) तुषार सिंचन असल्यास धुके, थंडी व दव ज्यादिवशी जास्त असेल त्यादिवशी तुषारसिंचन संच सकाळी 5-10 min चालवा. यामूळे दव धूवून जाते व नुकसानीचे प्रमाण कमी होते.
2) 100 दिवस झाल्यावर पाणी बंद करतातसिंचनास महत्वाच्या अवस्थाकंद निर्मितीच्या काळात तसेच कंद तयार होण्याच्या आधीच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.कीड
*नियंत्रणफुलकिडे
1) फुलकिडे झाल्यास पानांवर चंदेरी चट्टे उठतात, जे नंतर तपकिरी होऊन शेवटी पानेटोकाकडून वाकडी होतात व वाळतात
2) एका रोपावर 30 पेक्षा जास्त फुलकिडे दिसल्यास फवा-यांची गरज आहे असे समजा. एखादे रोप उपटून पाण्यात बुडवल्यास फुलकिडे त्यात तरंगतात आणि मोजता येतात.
3) मक्याच्या 2 रांगा पिकाभोवती लावल्यास त्या फूलकिड्यांसाठी अडथळ्याचे काम करतात. त्यामुळे फूलकिड्यांचा त्रास 80% पर्यंत कमी होऊन कमी फवारण्या लागतात.
4) फुलकिडे व करपा नियंत्रण. फिप्रोनिल @ 15 ml + मॅन्कोझेब @ 25 gm किंवा क्लोरोथॅलोनील @ 25 gm + स्टिकर @ 10 ml / 10 Ltr पाण्यात मिसळून फवारणी घ्या.
5) कार्बोसल्फान 2 ml / Ltr + कार्बेन्डॅझिम 2.5 gm / Ltr+ स्टिकर 0.7 ml / Ltr किंवा प्रोफेनॉफॉस 1 ml / Ltr + मॅन्कोझेब 2.5 gm / Ltr + स्टिकर 0.7 ml / Ltr आलटून पालटून फवारा.6) 15 ml फिप्रोनील 5 EC किंवा कार्बोसल्फान 25EC / 10 Ltr पाण्यात 10 ml स्टिकर मिसळून फवारावे
*अळी
1) कमी पावसामुळे काळसर मुळे पोखरणा-या अळीचा प्रादुर्भाव. नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस ( स्काउट, ट्रिसेल ) @ 2 Ltr / acre सिंचनाच्या पाण्यात किंवा वाळूत मिसळून द्या.
*लाल कोळी.
1) लाल कोळी. रोपातील रस शोषून घेतल्याने रोप पिवळे पडते व पानांवर चिकट द्रवाचा प्रादुर्भाव. सल्फर डस्ट 10 kg / acre चा वापर करा.
*रोग नियंत्रण
करपा
1) मावा व करपा ह्या रोगांच्या नियंत्रणासाठी 20 ml 30EC डायमेथोएट ( रोगर ) + 25 ग्रॅम बावीस्टीन + 10 ml स्टीकर ह्यांची 10 लिटर पाण्यातून फवारामररोग
*रोपवाटीकेतील मररोग नियंत्रण.
1)थायरम 3 gm / कि. बीजप्रक्रिया + 5 gm / चौ.मि. मातीप्रक्रिया करा. रोपात पाणी साचु देऊ नये
2) रोपवाटीकेतील मर रोग नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड @ 3 ml / Ltr पाण्यात मिसळून फवारणी करा. त्यानंतर 3 दिवसांनी कार्बनडॅझिम ( बाविस्टिन, झेन )@ 1 ml / Ltr ने भीजवणी करा.
3) पुनर्लागवडीनंतर मररोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी कॉपर ओक्सीक्लोराइड ची ( ब्लायटोक्स,ब्लू कॉपर ) @ 25 gm / 10 Ltr पाण्यातून मुळाजवळ भीजवणी करा.
*करपा
1) जमिनीत पाणी साचले किंवा निचरा चांगला नसल्यास काळा करपा होतो. पानावर काळपटडाग पडतात.पाने पूर्ण काळी होतात व वाळतात. रोगांचा प्रादुर्भाव कंद पोसण्यापूर्वी झाला तर माना लांब होतात. कांदा पोसत नाही.
2)करप्यासारख्या रोगांना आटोक्यात ठेवण्यासाठी कायम एकाच शेतात लागवड करणे टाळावे आणि पिकांची फेरपालट करत राहावी.
3) करप्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पायरॅक्लोस्ट्रॉबिन + मेटिराम @ 2gm / Ltr किंवा ट्रायफ्लोकझीस्ट्रोबीन + टेब्युकोनॅझोल @ 2 gm /Ltr फवारा. फवारणीच्या वेळी स्टिकर वापरा.
4) 10 Ltr पाण्यात मॅन्कोझेब ( डायथेन M-45, शिल्ड ) @ 25 gm किंवा कार्बनडॅझिम ( बाविस्टिन, सहारा ) @ 25 gm यांची 10-15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करा.
5) वाढीच्या काळात सध्याच्या हवामानात करप्याचा प्रादुर्भाव होत आहे. नियंत्रणासाठी टेब्युकोनॅझोल ( टॉरग्यु, फोलिक्यूर ) @ 2.5 gm / 10Ltr पाण्यात मिसळून फवारा.
6) शक्यतो एकाच वेळी जवळपासच्या सर्व शेतक-यानि फवारणी केल्यास रोगाचे चांगले नियंत्रण होते.
*केवडा
1) दमटपणा वाढल्यास, लावण्यास उशीर, खत-पाणी जास्त झाल्यास केवडा वाढतो. यात पूर्ण पानावर पांढरी ते जांभळी लव येऊन हिरव्या रंगाच्या अधेमधे चट्टे दिसतात
2) केवडा दिसल्यास शेतात मॅन्कोझेब 75WP ( डायथेन M-45, शिल्ड ) @ 2 gm प्रती लिटर पाण्यातून फवारापर्पल ब्लॉचपर्पल ब्लॉच / स्टेमफीलियम करपा. क्लोरथॅलोनील ( कवच, जटायु ) @ 2.5 gm / Ltr, प्रोपीकोनॅझोल ( रडार, टिल्ट, धन ) @ 1 gm / Ltr यापैकी एकाची फवारणीअन्य समस्याथंडीपासून रक्षण होण्यासाठी संध्याकाळी 8-10 ठिकाणी ओला कचरा किंवा गवत जाळल्याने शेतात उष्णता राहते. त्यामुळे दव व धुके पातीवर जमत नाहीत.
*काढणी आणि नंतरचे तंत्रयोग्य वेळ आणि तंत्र
1) तयार कांद्याची काढणी करा. लवकर काढणी केल्यास साठवणूकीत कोंब येतात व उशिराकाढणी केल्यास साठवणूकीत मुळे फुटण्यास सुरवात होते.
2) काढणी केल्यानंतर शेतामध्ये पीक अशा तरेने ठेवा की सूर्यकिरणे थेट कांद्यावरवर पडणार नाहीत. अशा परीस्थितीत पीक 7 ते 8 दिवस ठेवा.प्रतवारी आणि वर्गवारी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा