मिरची
मिरची
*पेरणीचे तंत्रपीक नियोजन
1) टोमॅटो, मिर्ची, बटाटा या पिकात विविध प्रकारचा करपा व विषाणूजन्य रोग आढळतात. म्हणून ही पिके एकमेकाजवळ घेण्याचे टाळा
2) वरच्या थरातील मातीत जास्त रोगाणु असतात. काही शेतक-यानी वरच्या थरातील माती(30 cm) काढून टाकली आणि खालील माती नर्सरी साठी वापरली. रोपमर झाली नाही.
3) कांदा आणि कोथिंबीर आंतरपीक म्हणून घेतल्यास जास्तीचे उत्पन्न मिळते. सोबत तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
4) मिर्चीमध्ये तृणधान्य पिके किंवा झेंडू, कांदा-लसूण यांचे आंतर पीक घेतल्याससुत्रकृमीचे नियंत्रण होते
*जमीन तयार करणे
1) जमीन व्यवस्थापन. जमिन नांगरुन वखरुन तयार करावी. हेक्टरी 9- 10 टन शेणखत मिसळा.
2) जिरायती पिकासाठी सपाट वाफ्यावर रोपे तयार करा. बागायतीसाठी गादी वाफ्यावर रोपे तयार करा.
3) 25 फुट लांब, 4 फुट रुंद, 10 सेमी उंच किंवा आवश्यकतेनुसार गादी वाफे तयार करा. प्रत्येक वाफ्याला 30 किलो शेणखत व अर्धा किलो सुफला द्या.
*जाती1)
1)फुले सुर्यमुखि. उंच आणि पसरणारी, भरपूर फांद्या असणारी. मोठी आणि रुंद पाने. फळे मध्यम, लांब असतात, घोळक्यात येणारी फळे.
2) भाग्य लक्ष्मी.हिरवट रंगाची फळे,पिकल्यावर लालरंगाची होतात.38-40%बियांचे प्रमाण.किड व रोगास प्रतिकारक.हिरव्या मिरचीसाठी उपयोगी
3) पुसा ज्वाला. हिरव्या, लाल मिरचीसाठी उपयुक्त.बुटके झाड. तिखट व वजनदार फळे,10-12cm लांब असून त्यावर सूरकुत्या असतात.
4) पावसाने 15दिवसांची ओढ दिल्यास काशी अनमोल, अर्का लोहित, काशी अर्ली, आइ आइ एच आर - सेल १३२ या जातीचा वापर करा
5) जी 2, जी 3, जी 4, जी 5, या जातीची फळे बुटकी. अधिक उत्तपादन देणा-या जाती. फळांची लांबी 5-8cm असून फळांना गर्द तांबडा रंग असतो
6) सँकेश्वरी 32. झाडे उंच, मिरची 20-25cm लांब असून पातळ सालीची असते. सालीवर सूरकुत्या असतात. वाळलेल्या मिरचीचा रंग लाल असतो.
7) पंत C1. हिरव्या व लाल मिरचीसाठी, या जातीची फळे उलटी असतात. पिकाल्यावर फळे लाल होतात. 8-10cm लांब असून साल जाड असते. बियांचे प्रमाण अधिक व बोकाड्या रोगास प्रतिकारक.
8) रोशनी 117, हाँटलाइन, JK 178, नैना, 541, JK 55, अंकुर 32, 226, 930, अंकुर 19, अग्निरेखा, जयंती, 3A-960, X235, G4 या जाती महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय आहेत.
*बीजप्रक्रीया
1) पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3gm किंवा कार्बनडॅझिम (बाविस्टिन,सहारा)1gm/kg ची प्रक्रिया करा
2) रासायनिक प्रक्रीयेनंतर ट्रायकोडर्माची@5gm/kg प्रक्रिया करा. नंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणी करा.
3) लागवडीआधी मुळे 15minट्रायकोडर्मा हेर्झीअनम 20gm+0.5ml/Ltr इमिडाक्लोप्रिड द्रावणात बुडवल्यानेशोषककिडी व रोगांपासून बचाव होतो
4) लागवडीआधी रोपांची VAM + नत्र स्थिरिकरण जीवाणूसोबत प्रक्रिया केली असता सुपर फॉस्फेटची 50% तर नत्राचि 25% बचत होते.लागवडपद्धत1) 30-40 दिवसांनी रोप लागवडीस तयार होते.
*लागवड
1)लागवडीस 6-8 आठवडे वयाची (15-20cm उंचीची) रोपे निवडा. सरीवंरबा पद्धतीने लागवड करा.
2) पेरणीसाठी खात्रीचे उत्तम दर्जाचे बियाणे वापरा. बीजदर प्रती एकर साठी@40-60gm/acre वापरा. रोपवाटिका तयारी.3x1m आकाराचा गादी वाफा तयार करा
3) उंच आणि पसरट वाढण्यार्या जातीची लागवड 60 X 60 cm अंतरावर आणि बुटक्या जातीची लागवड 60 X 45 cm व कोरडवाहू मिरचीची लागवड 45 X 45 cm अंतरावर करावी.
*रोपवाटिका व्यवस्थापन
1) वाफ्यास रुंदीस समांतर ओळी करून त्यात 10%G फोरेट@15gm/वाफ्याला द्या व मातीने झाका. नंतर बियांची पातळ पेरणी करा
2) पेरणी झाल्यावर 400 मेश नायलॉन नेट किंवा 2m उंचीचे पांढरे कापड गादीवाफ्यावर मच्छरदाणी सारखे लावा. किडीचा बंदोबस्त होतो.
3) उगवण होईपर्यंत वाफ्यांना दररोज झारीने पाणी द्या. पेरणीनंतर 15दिवसांनी रोपाच्या वाढीसाठी प्रत्येक वाफ्यास 50gm युरीया द्या.
4) जोरदार पावसामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोपवाटिकेत शेडनेटचा वापर करा. एका महिन्यानंतर शेडनेट काढून टाका. अन्यथा रोपे कमजोर होतात.
*तण व्यवस्थापन
1) ऑक्सीफ्लुरोफेन(गोल, ऑक्सीगोल्ड)@ 200ml/acre (200Ltr पाण्यामध्ये मिसळून) लागवडीच्या 1 ते 2दिवस आधी फवारा.
2) पेंडीमेथलिन(स्टॉंप, स्पीड, दोस्त)@1.3Ltr/acre प्रती 200Ltr पाण्यातून पुनर्लागवडिच्या 1 ते 2 दिवस आधी फवारा.
3) आंतरमशागत. लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी त्यानंतर तणांच्या तिव्रतेनुसार खुरपण्या करून शेत तण विराहित ठेवा.मशागतीबाबतप्लास्टिकल्चर आणि काटेकोर वापर आवश्यआहे
*पिकाचे पोषणरासायनिक खते
1)लावणी नंतर पहिला हप्ता 10-12 दिवसांनी द्या. युरीया@62kg, SSP@312kg, MOP@50kg (30:50:30 NPK kg/एकर)
2) खतव्यवस्थापन. चांगल्या वाढी व उत्पादनासाठी, पूर्न-लागवडीनंतर 40-45दिवसांनी MAP, 12:61:00@75gm/15Ltr पाण्यात मिसळून फवारा
3) जास्त फ़लधारणा व तोडे मिळण्यासाठी पीक फुलोरा अवस्थेत असताना पिकात गंधक(बेन्सल्फ)@10kg/एकर घाला व कॅल्शियम नायट्रेट@10gm/Ltr
*फवाराफर्टीगेशन
1)लावणीनंतर 30-60 दिवसांनी एकरी NPK 35:6:50kg, अमोनीयम सल्फेट 60kg, फॉस्फॅरिक असिड 10kg, 13:0:45@25kg आणि एमओपी 75kg द्या.
2) लागवडीनंतर 60-90 दिवसांनी अमोनियम सल्फेट@70kg, फॉस्फरिक ऍसीड@15kg,13:0:45@25kg, एमओपी@75kg प्रती एकर द्या.
*विद्राव्य खते
1) लागवडीनंतर 10-15दिवसात 19:19:19 आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये@2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारा.
2) 40-45दिवसांनी २० टक्के बोरॉन@1ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये@2.5 ते 3ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारा.
3) पिक फुलोरा अवस्थेत असताना 0:52:34@4-5ग्रॅम + मायक्रोन्युट्रीएंटस्@2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारा.
4) पिक फळधारणा अवस्थेत असताना 0:52:34@4 ते 5 ग्रॅम + बोरान@1ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारा.
5) फळ पोसत असतांना 13:0:45@4-5ग्रॅम + कॅल्शियम नायट्रेट@2-2.5ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारा.
*पीक संजीवके
1) चांगल्या उत्पादनासाठी तसेच फूलगळ कमी करण्यासाठी, पीक फुलावर आल्याबरोबर एन.ए.ए.(NAA) संजीवकाची@50mg/Ltr पाण्यात मिसळून फवारणी करा
2) फूल-फळ अवस्थेत सांभाळा, 20% जादा मिळवा. होमोब्रॅसिनॅलीड (डबल)@5मिली/10लिटर पाण्यात फुलोर्यावेळी 15दिवसांनी 3 वेळा फवारा.
3) ट्रायकॉंन्टॅनॉल@1.25ml/Ltr ची फवारणी 20,40,60 आणि 80व्या दिवसांनी लागवडीनंतर केल्यामुळे फळांची प्रत सुधारण्यास मदत होते.
*सिंचन
1) पाणी व्यवस्थापन. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. रोपे लावणीनंतर 10 दिवसात रोपांचा जम बसतो या वेळी 1 दिवसाआड शेता सारखे पाणी द्यावे.
2) बेताचे व सारख्या प्रमाणात पाणी द्या. कमी, जास्त झाल्यास फुलगळ होते. उन्हाळ्यात पूर्णकालावधीत पाण्याच्या 10-12 पाळ्या द्या.
3) संशोधन. विद्राव्य खतांचा वापर 7 दिवसाच्या अंतराने 14 समान हफ्त्यात ठिबक संचातून केला असता उत्पादना मध्ये वाढ होते. 30% नत्र व 20% स्फुरद, पालाश खताचि बचत होतेसिंचनास महत्वाच्या अवस्थाफुले लागण्याच्या काळात पाण्याचे आणि खताचे व्यवस्थापन उत्तम रीतीने केल्यास फूलगळीची शक्यता कमी होते.
*कीड नियंत्रणफुलकिडे
1) फुलकिडीच्या प्रादुर्भावाची तीव्रता समजण्यासाठी निळे चिकट सापळे(6-8/acre) वापरा. व्हर्टिसिलियम लेकॅनी@5gm/Ltr ची फवारणी करा.
2) फुलकिडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास. इमीडाक्लोप्रिड (कॉनफ़िडॉर) किंवा फिप्रोनिल (कॉमबॅट, फ्रंटलाइन)@1ml/Ltr ची फवारणी करा.
3) चुराडामुरडा(फुलकिडयामुळे पसरतो)चा प्रादुर्भाव पुणेभागात.नियंत्रणासाठी फिप्रॉनिल 80WP(जंप,रिजेन्ट)@2.5ml/Ltr याप्रमाणात फवारा
4)फुलकिडे/ मावा नियंत्रण.इमीडाक्लोप्रिड 17.8%SL(कॉनफिडोर)@0.3ml/Ltrकिंवा एसीफेट 75% WP(असटाफ)@1.0ml/Ltr ची फवारणी किंवा थायामेथोक्साम 25% WG(आक्टॅरा)@1.0ml/Ltr ची भिजवणी करा.
5)फळपोखरअळी
1) फळपोखरअळी नियंत्रण. विषारी अमिषाचे गोळे वापरा.त्यासाठी कोंडा@5kg,कार्बारील@500gm, गूळ@500gm+पाणी घेऊन यामिश्रणाचे गोळे बनवा.
2) क्लोरपायरीफॉस+सायपरमेथ्रीन (नुरेल-D/अमला)@30ml+टीपॉल@0.5ml/12Ltr फवारा.
6)पिवळा कोळी
.1) पिवळा कोळी व तूडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळ्यास, क्लोरफेनापायर (फॅनथम)@1.5ml/Ltr,अबामेक्टिन (अॅग्री-मेक, डीनामेक)@1.5ml/Ltr फवारा
2) कोळीच्या प्रादुर्भावामुळे 80%पर्यंत उत्पादनात घट होऊ शकते.स्पाइरोमेसीफ़िन 22.9SC@200ml/एकर,180Ltr पाण्यात मिसळून फवारा
*पांढरी माशी
पांढरी माशी नियंत्रण. असेटामिप्रिड 4gm/10Ltr पाण्यातून 15 दिवसांच्या अंतराने 2 वेळा फवारा.मावानियंत्रण: अॅँसिफेट 75SP@1gm/Ltr किंवा मिथिल डीमेटोन 25EC@2ml/Ltr किंवा फोसलॉन 35EC@2ml/Ltr ची फवारणी करा.रोग नियंत्रण
*भुरी
1) भुरीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवत आहे. नियंत्रणासाठी हेक्साकोनॅझोलची (कॉंन्टाफ,सितारा)+स्टिकर@1ml/Ltr पाण्यात मिसळून फवारणी करा.
2) अचानक झालेल्या पावसाने भुरीची शक्यता. तीव्रता कमी असल्यास पाण्यात विरघळणारे गंधक,@20gm/10Ltr,10दिवसाच्या अंतराने 2-3दा फवारा
*पिकावरील विविध ठिपके
1)पिकावरील विविध ठिपके आणि पिवळे पडण्याच्या रोगांसाठी प्रॉपिकॉनाझोल 25%EC (टिल्ट) @ 500 ml किंवा क्लॉरोथलोनिल 75%WP@875-1150ग्रॅम प्रती 500-600 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा
2) पानांवरील जीवाणूजन्यठिपके. स्ट्रेप्टोसायक्लीन@1gm+कॉपरओक्सीक्लोराईड (ब्लायटोक्स)@30gm/10Ltr पाण्यात मिसळून फवारा.डायबॅक2.5gm मंकोझेब किंवा कॉपर ओक्सीक्लोराईड (ब्लायटोक्स)@3gm/Ltrपाण्यातून फवारल्यास डायबॅक व फळकूजला प्रतिबंध होतो.मररोग
* मररोग.
1)कॉपर ओक्सीक्लोराईड (ब्लायटोक्स)@25gm किंवा कार्बनडॅझिम (बाविस्टिन)@20gm/10Ltr पाण्यातून झाडांना आळवनी द्या.
2) मूळकुजीमुळे मररोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा@ 2.5kg/500Ltr ची रोपाच्या मुळाजवळ भिजवणी करा.करपानियंत्रण: प्रॉपिकॉनाझोल(टिल्ट) किंवा हेक्साकोनॅझोल(कॉंन्टाफ, सितारा)@1ml/Ltr पाण्यात मिसळून फवारा.
*शेंडेमर
ढगाळ हवामानात शेंडेमर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कॉपर ओक्सीक्लोराइड (ब्लायटोक्स,ब्लू कॉपर)@25gm/10Ltr पाण्यात मिसळून फवारा.मोझैकमोझैकच्या प्रभावी नियंत्रणासाठी, 5 मिरचीच्या ओळीनंतर 2 ओळी मक्याच्या किंवा ज्वारीच्या हवेच्या विरुद्ध दिशेने लावणे. तूडतूडे नियंत्रणाचे उपाय करावेतअन्य समस्याजास्त तापमानामुळे आणि सिंचनाच्या आर्द्रतेमुळे मुळांजवळ बुरशीची शक्यता. ट्रायकोडर्मा 2 किलो/acre दिल्यास फायदा होतो.
*काढणी आणि नंतरचे तंत्रप्रक्रिया व मूल्यवर्धन
अधिक उत्पादनासाठी, युरीया@10gm/Ltr आणि विद्राव्य पालाश@10gm/Ltr चे (प्रत्येकी 1%) द्रावण दर 15दिवसानी मिरचीचा तोडा चालू असताना द्या.
Must
उत्तर द्याहटवाMust
उत्तर द्याहटवा