निंबोण्यांचाअर्क(एनएसकेई)

*निंबोण्यांचाअर्क(एनएसकेई)तयारकरणेनिंबोण्याExtract (NSKE) preparation(५%द्रावण)

आवश्यकसामुग्री
५% शक्तीचे १०० लिटर निंबोणीचा अर्क तयार करण्यासाठी
*.कडुनिंबाच्या निंबोण्या (पूर्णपणे सुकलेल्या) – ५ किग्रॅ
*.पाणी (चांगले व स्वच्छ) – १०० लिटर
*.साबण (२०० ग्रॅम)
*.गाळण्यासाठी कापड

बनवण्याचीपद्धत

*.गरजेप्रमाणे निंबोण्या ( ५ किग्रॅ ) घ्या
*.त्या दळून त्यांची पावडर बनवा
*.१० लिटर पाण्यात ही पावडर रात्रभर भिजवा.
*.दुसर्याू दिवशी सकाळी लाकडी काठीने हे पाणी दुधासारखे पांढरे दिसेपर्यंत ढवळा
*.दुहेरी कापडातून गाळून एकंदर १०० लिटर बनवा
*.ह्यामध्ये १% साबण घाला (प्रथम साबणाची पेस्ट बनवा व नंतर ती सर्व पाण्यात मिसळा)
*.चांगले ढवळून वापराटीप
*.निंबोण्या धरतेवेळीच झाडावरून गोळा करा आणि सावलीत वाळवा
*.आठ महिन्यांपेक्षा जुन्या निंबोण्या वापरू नका कारण इतक्या जुन्या बियांमध्ये जरूर ती कीडनाशक शक्ती राहात नाही
*.नेहमी निंबोण्यांचा ताजा अर्क (NSKE) वापरा.

*.योग्य परिणाम मिळण्यासाठी दुपारी ३.३० नंतर तो फवारा.

    

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट